कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत प्यायलं किटकनाशक; पिंपरीत तरुणानं केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 23:44 IST2026-03-27T23:44:02+5:302026-03-27T23:44:02+5:30
घरगुती भांडणावरून त्यांनी शुक्रवारी दारूच्या नशेत एक लिटर कीटकनाशक प्राशन केले.

कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत प्यायलं किटकनाशक; पिंपरीत तरुणानं केली आत्महत्या
पिंपरी - यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कर्मचाऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. संदीप राघोजी नलावडे (३५, नेहरूनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि २७ मार्च) नेहरूनगर येथे घडली.
संत तुकारामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नलावडे हे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कामास होते. त्यांना दारूचे व्यसन होते. घरगुती भांडणावरून त्यांनी शुक्रवारी दारूच्या नशेत एक लिटर कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
नलावडे वॉर्ड बॉय आहेत, अशी माहिती समाज माध्यमावर झळकली. मात्र, नलावडे हा वॉर्ड बॉय नसल्याचे वायसीएम प्रशासनाने सांगितले आहे. तो तरुण औषध फवारणीसाठी वायसीएममध्ये येत असल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.