धक्कादायक! कॉलेजमधून तरुणी घरी परतत होती, लिफ्ट मागितली अन् घात झाला; चौघांनी सामुहिक अत्याचार केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:29 IST2025-02-25T15:28:44+5:302025-02-25T15:29:38+5:30
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

धक्कादायक! कॉलेजमधून तरुणी घरी परतत होती, लिफ्ट मागितली अन् घात झाला; चौघांनी सामुहिक अत्याचार केला
कॉलेजमधून घरी परतत असलेल्या एका विद्यार्थीनीवर चौघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. कॉलेज संपल्यानंतर ती तरुणी बस स्टॉपवर थांबली होती, बस वेळेत आली नाही म्हणून तरुणीने आपल्याच गावातील चार तरुणांना लिफ्ट मागितली. तरुणांनी त्या विद्यार्थीनीला जंगलामध्ये घेऊन जात तिच्यावर लैगिंक अत्याचार केले.
मिळालेली माहिती अशी, ती तरुणी बीटेक मध्ये शिकत आहे. कॉलेज संपल्यानंतर तरुणी घरी परकण्यासाठी निघाली, यावेळी बस नसल्यामुळे तिने तिच्या गावातीलच तरुणांकडे लिफ्ट मागितली. पीडितेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले आणि तरुण तिला जंगलात घेऊन गेला. पीडितेवर तरुणाच्या तीन साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेने घरी पोहोचून संपूर्ण घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली. तिच्या नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठल्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली .
पीडिता शनिवारी कॉलेजमधून घरी जात होती. बस स्टँडवर उतरल्यानंतर तिला गावाकडे जाणारी एक ऑटो रिक्षाची वाट पाहत होती. हिमांशू नावाच्या तरुणाने त्याची बाईक काढली आणि तिथे आला.त्याने तरुणीने घरी सोडण्यासाठी विचारले, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीला तो जंगलात घेऊन गेला.तिथे त्याचे तीन मित्र आधीच उपस्थित होते. आरोपीने तरुणीवर लैगिक अत्याचार केले, पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
ओळखीच्या तरुणाने दिली लिफ्ट
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडिता बी.टेकची विद्यार्थिनी आहे. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास विद्यार्थी घरी परतत असताना. त्यानंतर ओळखीच्या तरुणाने दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने हा गुन्हा केला. आयपीएस अधिकारी राजेश धुनावत म्हणाले, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी हिमांशू, सागर, सिद्धार्थ आणि आदेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.