जालन्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा झोपेतच खून

By दिपक ढोले  | Updated: May 7, 2023 12:24 IST2023-05-07T12:19:48+5:302023-05-07T12:24:25+5:30

प्रमोद झिने हे राहत्या घराच्या अंगणात रात्री पंलग टाकून झोपले होते. रात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार केले.

A young man was killed in his sleep by stabbing him with a sharp weapon in Jalna | जालन्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा झोपेतच खून

जालन्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा झोपेतच खून

दीपक ढोले

जालना : घराच्या अंगणात झोपलेल्या ३९ वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची जालना शहरातील सिरसवाडी रोडवरील टीव्ही सेंटर भागात रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. प्रमोद जनार्दन झिने (३९) असे मयताचे नाव आहे.

प्रमोद झिने हे राहत्या घराच्या अंगणात रात्री पंलग टाकून झोपले होते. रात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या अंगावर रग टाकून दिली. रविवारी सकाळी प्रमोद झिने का उठले नाही, म्हणून त्यांची बायको आणि वडील त्यांना उठविण्यासाठी गेले असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये, पोलीस उपनिरीक्षक हरीश राठोड, पोलीस उपनिरीक्षक वनवे, पोलीस हवालदार रामराव चापलकर, उदलसिंग जारवाल, वसंत धस, विलास आटोळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

Web Title: A young man was killed in his sleep by stabbing him with a sharp weapon in Jalna