अल्पवयीन मुलीचा हात पकडल्याप्रकरणी तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: May 18, 2023 16:57 IST2023-05-18T16:56:10+5:302023-05-18T16:57:05+5:30
याप्रकरणी नरसिंग चन्नेपाग ( रा. सोलापूर ) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

अल्पवयीन मुलीचा हात पकडल्याप्रकरणी तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
रूपेश हेळवे
सोलापूर : पंधरा वर्षाच्या पीडितेचा पिच्छा करत तिचा हात पकडून माझ्यासाेबत बाहेर चल म्हणत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नरसिंग चन्नेपाग ( रा. सोलापूर ) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलगी ही आपल्या मैत्रिणीसोबत चालत सात रस्ता परिसरातून जात असताना १७ मे रोजी दुपारी आरोपी दुचाकीवर येऊन पीडितेला हात पकडून तुझ्याशी बोलायचे आहे, माझ्यासोबत बाहेर चल म्हणाला. पीडितेने नकार देऊनही आरोपीने पीडितेचा पाठलाग सुरूच ठेवला. यामुळे ही घटना पीडितेने वडिलांना सांगितली. या नंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.