कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून

By अविनाश कोळी | Updated: June 11, 2024 11:13 IST2024-06-11T11:13:06+5:302024-06-11T11:13:38+5:30

संजयनगर येथील घटना : हल्लेखोरोंचा शोध सुरु

A young man from Kolhapur district was stoned to death in Sangli | कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून

कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून

संजयनगर : सांगलीत संजयनगर येथे मयुरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले.जि. कोल्हापूर) या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. हल्लेखोर व खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयुरेश हा भेंडवडेचा असला तरी तो कामानिमित्त सांगलीत रहात होता. हल्लेखोरांच्या तपासाकरीता श्वानपथकाला बोलावण्यात आले होते. श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला. 

राजूनगरजवळ भरणाऱ्या मंगळवार बाजार परिसरात मशिदीपासून काही अंतरावर हा खून झाला आहे. फॉरेन्सिक टिमनेही घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींना पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी मृत तरुणाची दुचाकी व गुन्ह्यात वापरलेला दगड आढळून आला. 

घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा , संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  बयाजी कुरळे , पोलीस निरीक्षक सतीश शिंदे , यांनी पाहणी केली. अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत. खुनामुळे संजयनगर परिसरात खळबळ माजली आहे.

Web Title: A young man from Kolhapur district was stoned to death in Sangli