काैटुंबिक वादातून चिमुकलीला विष देऊन महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 20:56 IST2022-07-31T20:55:46+5:302022-07-31T20:56:50+5:30
Suicide Attempt :मलकापूर पांग्रा येथील घटना; चिमुकलीवर उपचार सुरू

काैटुंबिक वादातून चिमुकलीला विष देऊन महिलेची आत्महत्या
मलकापूर पांग्रा (बुलडाणा) : काैटुंबिक वादातून २१ वर्षीय विवाहितेने तिच्या आठ महिन्यांच्या मुलीला विष पाजले. एवढेच नव्हे तर शेतातील घरात जाऊन गळफास लावून घेतला. यामध्ये त्या विवाहितेचा मृत्यू झाला असून, ही हृदय हेलावणारी घटना ३१ जुलै राेजी सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे घडली. दीपाली नीलेश वरकड असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पुण्यात राहणारे दीपाली वरकड व नीलेश वरकड हे काही महिन्यांपासून मलकापूर पांग्रा येथील शेतात राहतात. दरम्यान, दीपाली हिने ३१ जुलै राेजी काैटुंबिक वादातून आपल्या वीरा या आठ महिन्यांच्या मुलीला विष पाजले. त्यानंतर शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गावापासून दूर असलेल्या शेतात हे कुटुंब राहत असल्याने या घटनेची ग्रामस्थांना उशिरा माहिती मिळाली. साखरखेर्डा पाेलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आठ महिन्यांच्या मुलीवर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करत आहेत.