एका महिलेने अन् तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून केली पतीच्या प्रियसीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 21:28 IST2022-10-07T21:28:00+5:302022-10-07T21:28:08+5:30

मुंबई- पतीचे परस्त्रीशी असलेल्या संबंध मधून एका महिलेने तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून पतीच्या प्रियसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. कुर्ला ...

A woman and her two friends killed her husband's lover in mumbai | एका महिलेने अन् तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून केली पतीच्या प्रियसीची हत्या

एका महिलेने अन् तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून केली पतीच्या प्रियसीची हत्या

मुंबई- पतीचे परस्त्रीशी असलेल्या संबंध मधून एका महिलेने तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून पतीच्या प्रियसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. कुर्ला येथील बंटर भवन समोरील नाल्यात एका गोणीत एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन मध्ये या महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह गोणीत भरून गोणी नाल्यात टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले होते. या बाबत नेहरूनगर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर  घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केलीं असता दोन महिलांनी रिक्षातून ही गोणी आणल्याचे समोर आले.

रिक्षा चालकाचा शोध लागताच या सर्व प्रकरणाचा उलघडा झाला. मिनल पवार हिचे पतीचे मयत महिलेशी प्रेमसंबंध असल्याने त्याचा राग मनात धरून मिनल पवार हिने तिची बहिण  शिल्पा  आणि मैत्रीण डॉली भालेराव यांच्या मदतीने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.मीनल च्या पतीचे मयत ईशा मिस्त्री या सोळा वर्षाच्या तरुणीशी प्रेम संबंध होते. योगेशने तिला त्याच्या पत्नीची मैत्रीण डॉलीच्या घरी नेवून ठेवले. डॉलीने याची माहिती मीनल ला दिली.मीनल ने माहुल गाव येथे डॉलीच्या घरी तिची बहीण शिल्पा सोबत जाऊन तिचा गळा दाबला.या वेळी डॉली आणि शिल्पा ने तिला मदत केली.हा मृतदेह गोणीत भरून रिक्षातून आणून तिने कुर्ला येथील बंटर भवन येथील नाल्यात आणून हा मृतदेह टाकला होता.मात्र पोलिसांनी या प्रकरणी चोवीस तासात तपास करून तिन्ही महिला आरोपी ना अटक केली आहे.

Web Title: A woman and her two friends killed her husband's lover in mumbai