३ बहिणींच्या मृत्यूनंतर पोलीस तपासात आला भलताच ट्विस्ट; घरात सापडलेली डायरी रहस्य उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 08:38 IST2026-02-05T08:37:44+5:302026-02-05T08:38:08+5:30

मृतांमध्ये निशिका, प्राची, पाखी या तिन्ही बहि‍णींचा समावेश होता. त्या भारत सिटीतील बी १ टॉवरमध्ये ९ व्या मजल्यावर राहत होत्या. तिघीही अल्पवयीन होत्या.

A twist in the police investigation after the death of 3 sisters in Ghaziabad; The diary found in the house will reveal the mystery | ३ बहिणींच्या मृत्यूनंतर पोलीस तपासात आला भलताच ट्विस्ट; घरात सापडलेली डायरी रहस्य उलगडणार

३ बहिणींच्या मृत्यूनंतर पोलीस तपासात आला भलताच ट्विस्ट; घरात सापडलेली डायरी रहस्य उलगडणार

गाझियाबाद - शहरातील भारत सिटी सोसायटीत बुधवारी रात्री एका उंच इमारतीवरून ३ अल्पवयीन मुलींनी उडी मारली. रात्री २.३० च्या सुमारास जेव्हा सर्व गाढ झोपेत होते तेव्हा अचानक जोरदार किंचाळी ऐकायला आली. कुणालाही काहीच ठाऊक नव्हते, एका झटक्यात ३ निष्पाप मुलींनी जीव सोडला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या मुलींनी हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

कोण होत्या ३ बहिणी?

मृतांमध्ये निशिका, प्राची, पाखी या तिन्ही बहि‍णींचा समावेश होता. त्या भारत सिटीतील बी १ टॉवरमध्ये ९ व्या मजल्यावर राहत होत्या. तिघीही अल्पवयीन होत्या. शिक्षणासोबत त्या ऑनलाइन गेमिंग आणि मोबाईलमध्ये रमलेल्या असायच्या. प्राथमिक तपासात समोर आले की, या तिन्ही बहिणी रात्री एकत्र ९ व्या मजल्याच्या बाल्कनीत पोहचल्या. तिथे रेलिंग पार करण्यासाठी २ स्टेपच्या सिढीचा वापर केला. त्यानंतर एका पाठोपाठ एक खाली उडी घेतली. यावेळी घरातील इतर सदस्य गाढ झोपेत होते. कुणालाही याची भनक लागली नाही. काही सेकंदात या तिघीही जमिनीवर खाली पडल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

जेव्हा मुली खाली पडल्या तेव्हा मोठा आवाज झाला. त्यावेळी आसपासचे लोक घराबाहेर पडले. समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. या मुली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. लोकांना काही कळायच्या आधीच काहींनी मुलींच्या नातेवाईकांना सूचना दिली. त्यानंतर सोसायटीत मोठा गोंधळ उडाला. कुटुंबातील लोक आक्रोश करत होते. त्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका आणि पोलीस दाखल झाले. रात्री २.१५ वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. प्रथमदृष्ट्या हे आत्महत्येचे प्रकरण मानले जात आहे परंतु पोलीस सर्व अँगलने या घटनेचा तपास करत असल्याची माहिती एसीपी अतुल कुमार सिंह यांनी दिली.

सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय?

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोट आढळली. ज्यात एका डायरीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात मम्मी, पापा सॉरी असं लिहिले होते. या मुलींच्या खोलीत सापडलेल्या डायरीत काही संकेत आणि भावनात्मक गोष्टी लिहिल्या आहेत. सुसाइड नोट आणि डायरी हा या घटनेतील महत्त्वाचा सुगावा आहे. मुलींच्या आत्महत्येमागे ऑनलाइन कोरियन टास्क बेस्ड लवर गेम जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. या तिन्ही मुलींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. त्यातील डिजिटल हालचाली, चॅट, गेमिंग आणि त्या कुणाच्या संपर्कात होत्या याचाही पोलीस तपास करत आहे. या मुलींवर कुणी मानसिक दबाव आणत होते का याचाही पोलीस शोध घेत आहेत. 

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत आणखी एक खुलासा झाला आहे. या मुलींना एखाद्या कोरियन मुलाशी लग्न करायचे होते. तिघींना कोरियन संस्कृती खूप आवडत होती. याच गोष्टीने त्यांचे कुटुंब त्रस्त होते. यामुळे घरच्यांनी त्यांचे मोबाइलही काढून घेतले होते. सध्या पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.  

Web Title : गाजियाबाद: तीन बहनों की आत्महत्या में चौंकाने वाला मोड़; डायरी में मिले सुराग

Web Summary : गाजियाबाद में तीन बहनों ने आत्महत्या की, जिससे पुलिस जांच शुरू हो गई है। एक सुसाइड नोट और डायरी ऑनलाइन कोरियाई गेम और कोरियाई संस्कृति के प्रति आकर्षण का संभावित संबंध दर्शाते हैं। परिवार ने इस जुनून के कारण उनके फोन जब्त कर लिए थे। पुलिस सभी कोणों से जांच कर रही है।

Web Title : Ghaziabad: Suicide of Three Sisters Reveals Shocking Twist; Diary Holds Clues

Web Summary : Three sisters in Ghaziabad committed suicide, sparking a police investigation. A suicide note and diary suggest a possible link to online Korean games and a fascination with Korean culture. The family had confiscated their phones due to this obsession. Police are investigating all angles.