शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिकाने जळत्या चितेतून मृतदेह काढला बाहेर, शिरच्छेद करून घरी नेले; तंत्रमंत्र करणार होता तितक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 21:27 IST

Crime News : तेथे पोलिसांनी आरोपीच्या घरातून छिन्नविछिन्न शीर जप्त करून दोन आरोपी तांत्रिकांना अटक केली.

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये तंत्र मंत्राचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंत्र-मंत्राच्या नावाखाली एका तांत्रिकाने जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला आणि त्याचा शिरच्छेद करून घरी गेला. चितेतून मृतदेह गायब झाल्याचे वृत्त समजताच नातेवाइकांनी पोलिसांसह तांत्रिकाच्या घरावर छापा टाकला, तेथे पोलिसांनी आरोपीच्या घरातून छिन्नविछिन्न शीर जप्त करून दोन आरोपी तांत्रिकांना अटक केली.शाहजहांपूरमध्ये तंत्रमंत्राचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका तांत्रिकाने जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला आणि त्याचा शिरच्छेद करून तो आपल्या घरी नेल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मृताच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तंत्र-मंत्रासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण ठाणे तिल्हार येथील पिप्रौली गावचे आहे, जिथे वृद्ध कुबेर गंगवार यांचे आजारपणाने निधन झाले. नातेवाइकांनी गावाबाहेर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि घरी परतले.जळत्या चितेतून मृतदेह काढून शिर कापलेयानंतर गावातील गोपी आपल्या दोन साथीदारांसह तेथे पोहोचला आणि जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला आणि धारदार शस्त्राने मृतदेहाचे मुंडके कापले. यानंतर गोपीने कापलेले शिर पेंढ्यात लपवले. दरम्यान, गावातील एका व्यक्तीने गोपीचे हे कृत्य पाहिले. ही बाब त्यांनी गावकऱ्यांना सांगितल्यावर संपूर्ण गावात हा प्रकार पसरला. मृताचे नातेवाईक गावकऱ्यांसह त्याच्या घरी पोहोचले, तेथे वादानंतर गोंधळ सुरू झाला. गोंधळानंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी गोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.पोलिसांनी त्याच्या घरातून छिन्नविछिन्न शिर जप्त केले आहे. चौकशीत गोपीचे वडील तावीज बनवण्याचे काम करतात तसेच तंत्र मंत्राचेही काम करतात. त्यांच्या सांगण्यावरून दोघांनी मृतदेहाचे शिर कापलं जेणेकरून शिराचा वापर करून तंत्र मंत्राचा प्रयोग केला जाऊ शकतो. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू