चालकाला दमदाटी करत १२ लाखाचा टँकर पळवला
By रूपेश हेळवे | Updated: August 9, 2023 15:29 IST2023-08-09T15:28:58+5:302023-08-09T15:29:16+5:30
फिर्यादी यांच्या मालकीचा टँकर आरटीओच्या पासिंगसाठी त्यांचे मावस बंधू लक्ष्मण डवले व अभिमान बेलछत्रे हे घेऊन गेले.

चालकाला दमदाटी करत १२ लाखाचा टँकर पळवला
रुपेश हेळवे
सोलापूर : चालक आणि क्लिनरला दमदाटी करत धक्काबुक्की करत त्यांच्या ताब्यातील १२ लाख रूपये किमतीचा टँकर पळवल्याची घटना आरटीओ ऑफीस ते आंबेडकर चौक दरम्यान घडली. याप्रकरणी तुकाराम शिवाजी सलगर ( वय ४१, रा. मोहोळ) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांच्या मालकीचा टँकर आरटीओच्या पासिंगसाठी त्यांचे मावस बंधू लक्ष्मण डवले व अभिमान बेलछत्रे हे घेऊन गेले. आरटीओ ऑफिस मधील काम संपवून गावाकडे जात असताना दोन अनोळखी इसमांनी डवले व बेलछत्रे यांना दमदाटी, धक्काबुक्की करत वरील टँकर जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी तुकाराम सलगर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई गायकवाड करत आहेत.