मैत्रीला काळिमा! 'भाभी' म्हणत घराची पायरी चढला, एकटी पाहून पिस्तूल रोखलं अन्... दोस्ताच्या पत्नीवरच केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:24 IST2026-02-11T15:22:21+5:302026-02-11T15:24:11+5:30

ज्याला पती आपला जीवाभावाचा मित्र मानत होता आणि जी त्याला 'दीर' समजून आदर देत होती, त्याच नराधम मित्राने मैत्रीच्या नात्याची अब्रू वेशीवर टांगली.

A stain on friendship! He climbed the steps of the house calling himself 'Bhabhi', saw that he was alone and pulled out a pistol and... tortured his friend's wife | मैत्रीला काळिमा! 'भाभी' म्हणत घराची पायरी चढला, एकटी पाहून पिस्तूल रोखलं अन्... दोस्ताच्या पत्नीवरच केला अत्याचार

AI Generated Image

मैत्री हे विश्वासाचं नातं मानलं जातं, पण याच विश्वासाला तडा देणारी एक संतापजनक घटना पलवल जिल्ह्यातील गदपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ज्याला पती आपला जीवाभावाचा मित्र मानत होता आणि जी त्याला 'दीर' समजून आदर देत होती, त्याच नराधम मित्राने मैत्रीच्या नात्याची अब्रू वेशीवर टांगली. पिस्तुलाचा धाक दाखवून या नराधमाने आपल्याच मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली. पीडित महिला त्या दिवशी घरात एकटीच होती आणि तिचा पती काही कामानिमित्त बाहेर गेला होता. हीच संधी साधून पतीचा मित्र सागर हा त्यांच्या घरी पोहोचला. घरात आपला मित्र नाही आणि त्याची पत्नी एकटीच आहे हे पाहून सागरची नियत फिरली.

पिस्तुलाचा धाक दाखवला अन्..

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सागरने घरात शिरताच अचानक पिस्तूल काढलं आणि महिलेच्या कानशिलाला लावलं. "ओरडलीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन," अशी धमकी देत त्याने पीडितेवर अत्याचार केला. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही, तर जातानाही त्याने पीडितेला तोंड बंद ठेवण्यासाठी धमकावले.

वागण्यातील बदलामुळे फुटलं भांडं

या घटनेनंतर पीडित महिला प्रचंड धक्क्यात होती. ती घरात कोणाशीही बोलत नव्हती आणि सतत रडत होती. तिच्या वागण्यातील हा बदल पतीच्या आणि कुटुंबाच्या लक्षात आला. जेव्हा घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन वारंवार विचारणा केली, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला, ज्यानंतर पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.

आरोपी सागरचा गुन्हेगारी इतिहास

कुटुंबाने तातडीने गदपुरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस सध्या त्याच्या मागावर असून त्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title : दोस्त ने तोड़ा विश्वास: हरियाणा में बंदूक की नोक पर दोस्त की पत्नी से बलात्कार

Web Summary : पलवल, हरियाणा में, एक आदमी ने बंदूक से धमकाकर अपने दोस्त की पत्नी के साथ बलात्कार किया। महिला घर पर अकेली थी जब हमलावर, जो एक जाना माना अपराधी है, आया। पत्नी के व्यवहार में बदलाव देखने के बाद पति को अपराध का पता चला।

Web Title : Friend Betrays Trust: Rapes Friend's Wife at Gunpoint in Haryana

Web Summary : In Palwal, Haryana, a man raped his friend's wife after threatening her with a gun. The woman was alone when the assailant, a known criminal, arrived. The husband discovered the crime after noticing changes in his wife's behavior.