जवानाने मित्राकडून मारून घेत केला बनाव; पाठीवर लिहिले ‘पीएफआय’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 06:45 IST2023-09-27T06:45:02+5:302023-09-27T06:45:38+5:30
प्रसिद्धीसाठी पाठीवर लिहिले ‘पीएफआय’

जवानाने मित्राकडून मारून घेत केला बनाव; पाठीवर लिहिले ‘पीएफआय’
कोल्लम (केरळ) : सहा जणांनी आपल्यावर हल्ला करून पाठीवर ‘पीएफआय’ लिहिल्याचा दावा करणाऱ्या सैनिकाला मंगळवारी त्याच्या मित्रासह ताब्यात घेण्यात आले. या सैनिकाने कथितरीत्या प्रसिद्धीसाठी हल्ल्याचा बनाव केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. दक्षिण केरळच्या कडक्कल येथे घडलेल्या या कथित घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी लष्करी शिपाई शाइन कुमार व त्याच्या मित्राचे जबाब नोंदविले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
असा आखला कट...
कुमारच्या मित्राने सांगितले की, प्रसिद्धीसाठी कुमारने हा संपूर्ण कट आखला होता. त्याने दावा केला की कुमारने त्याला त्याच्या पाठीवर ‘पीएफआय’ लिहिण्यास व त्याला मारहाण करण्यास सांगितले.