सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून केले ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 12:38 IST2024-06-12T12:38:34+5:302024-06-12T12:38:45+5:30

ही घटना जामनेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ११:३० वाजता उघडकीस आली.

A six-year-old girl was tortured and killed  | सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून केले ठार 

सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून केले ठार 

- लियाकत सय्यद

जामनेर (जि.जळगाव) :  आदिवासी कुटुंबातील सहा वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिला ठार केले. ही घटना जामनेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ११:३० वाजता उघडकीस आली.

मंगळवारी दुपारी या बालिकेचे आई-वडील शेतात गेले होते. दुपारी तिला या नराधमाने दुकानावर जाऊ, असे सांगत सोबत नेले. सायंकाळी उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही,  नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. रात्री ही बालिका गाव परिसरातील एका शेतात मृतावस्थेत आढळली.  त्यावेळी ही घटना उघडकीस आली. 

पोलिस रात्रीपासून आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी रात्रीच गावात पोहचत सूचना दिल्या.

Web Title: A six-year-old girl was tortured and killed