वृद्ध महिलेला विवस्त्र केलं, मारलं अन् व्हिडिओही काढला, मग...; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:53 IST2022-12-05T12:53:22+5:302022-12-05T12:53:45+5:30

पीडित वृद्धेचा तक्रारीवरून गंगापूर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A shocking incident of beating an old woman and removing her clothes has taken place in Aurangabad. | वृद्ध महिलेला विवस्त्र केलं, मारलं अन् व्हिडिओही काढला, मग...; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

वृद्ध महिलेला विवस्त्र केलं, मारलं अन् व्हिडिओही काढला, मग...; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

गंगापूर (औरंगाबाद): आमच्या नातीला तुझ्या नातवाने पळवून नेले, असा आरोप करत गंगापूर भेंडाळा शिवारात राहणाऱ्या वृध्द महिलेला तालुक्यातील ओझर येथील तिघांनी घरी नेऊन विवस्त्र करून मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संतापजनक म्हणजे आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. पीडित वृद्धेचा तक्रारीवरून गंगापूर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील ओझर येथे राहणारे आरोपी विवेक उर्फ चावल्या पिंपळे, भावड्या पिंपळे नितुबाई पिंपळे या सर्वांनी मिळून शनिवारी (३) रोजी दुपारी गंगापूर शिवारात राहणाऱ्या वृध्द महिलेच्या घरी जाऊन तुझ्या नातवाने आमच्या मुलीला पळवून नेले असा आरोप केला व महिलेला गाडीत बसवून मुलीला शोधायला जायचे आहे, असे सांगून सोबत घेतले व ओझर या ठिकाणी घरी नेऊन विवस्त्र केले. आमची मुलगी कोठे आहे, असे विचारत दिवस रात्र डांबून ठेवले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

सदरील महिलेला रात्री उशिरा सोडून दिले. आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली; घाबरलेल्या पिडीतेने नातेवाईकांना सोबत घेऊन गंगापूर पोलिसात तक्रार दिली महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गंगापूर पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; अधिक तपास पोनि रवींद्र खांडेकर हे करीत आहे.

Web Title: A shocking incident of beating an old woman and removing her clothes has taken place in Aurangabad.