कापलेला हात सापडला फ्लायओव्हरखाली, शरीराचे इतर अवयव पडलेले होते रेल्वे रुळावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 20:56 IST2022-03-04T20:51:33+5:302022-03-04T20:56:10+5:30
Crime News : शरीराच्या अनेक तुकड्यांमध्ये मृतदेह मिळाल्यानंतर जीआरपीचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ट्रेनच्या धडकेने झाला असावा किंवा त्याने आत्महत्या केली आहे.

कापलेला हात सापडला फ्लायओव्हरखाली, शरीराचे इतर अवयव पडलेले होते रेल्वे रुळावर
दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एका व्यक्तीचा कापलेला हात सापडला आहे. रात्रभर शोध मोहीम राबवल्यानंतर जीआरपीने रेल्वे रुळावरून मृतदेहाचे इतर तुकडे जप्त केले आहेत. आता पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गुरुग्राममधील बजघेडा उड्डाणपुलाजवळ रेल्वे रुळाजवळ एका व्यक्तीचा अपघात झाल्याची बातमी मिळाली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता उड्डाणपुलाखाली कुत्र्यांनी क्लचके तोडलेला हात सापडला. यानंतर जीआरपी आणि पोलिसांनी रेल्वे रुळाच्या आजूबाजूला मृतदेहाचा शोध सुरू केला, तेव्हा मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले. आश्चर्याची बाब म्हणजे गुरुग्राम ते दिल्ली या रेल्वे रुळावरून मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे सापडले आहेत. शरीराच्या अनेक तुकड्यांमध्ये मृतदेह मिळाल्यानंतर जीआरपीचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ट्रेनच्या धडकेने झाला असावा किंवा त्याने आत्महत्या केली आहे. पुढे पोलिसांनी सांगितले की, या अपघातात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह उडून आजूबाजूच्या कुत्र्यांनी तो खाण्यास सुरुवात केली असेल.
पुढे अनेक किलोमीटरपर्यंत रेल्वे मार्गावर मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे सापडले आहेत. मृताच्या हातावर फुलासारखा टॅटू बनवण्यात आला असून त्यामुळे पोलीस त्याची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत. याच्या एक दिवस आधी गुरुग्राममधील गोल्फ कोर्समध्ये एका कार चालकाने दुचाकीवरील चार डिलिव्हरी बॉयला चिरडले. ही घटना बुधवारी रात्री उशिराची असल्याचे सांगण्यात येत आहे. चारही अपघातात जखमी झालेल्या मुलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.