नैराशातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, पाचव्या मजल्यावरून घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 00:27 IST2023-01-25T00:26:24+5:302023-01-25T00:27:27+5:30
मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात नेहा आई वडिलांसोबत राहत होती.

नैराशातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, पाचव्या मजल्यावरून घेतली उडी
मनीषा म्हात्रे -
मुंबई : नैराशातून गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम गिरप यांची २४ वर्षीय मुलगी नेहाने पाच मजली इमारतीच्या टेरेस वरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी नवघर पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास करत आहे.
मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात नेहा आई वडिलांसोबत राहत होती. ती तणावात असल्याने तिच्यावर उपचार देखील सुरू होते. ती एमबीएच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होती. तिने मंगळवारी दुपारच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले आहे. या घटनेने गीरप कुटुंबीयांना धक्का बसला आहे. घटना स्थळावरून सुसाईड नोट मिळाली नसल्याचे पोलीसांनी सांगितले.