शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सासूला संपवण्यासाठी ७२ तास आधीच रचलेला कट; भाडेकरूच्या प्रेमात पडलेल्या सुनेने काय-काय केलं.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 10:13 IST

आरोपी राजन शर्मा हा ३ वर्षांपूर्वी निर्मला देवी यांच्या घरात भाडेकरू म्हणून आला होता. अवघ्या काही महिन्यांतच घरमालकाची पत्नी रंजना आणि राजन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील महानगर परिसरात झालेल्या निर्मला देवी या वृद्ध महिलेच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. ही केवळ लूटमार किंवा अपघाती घटना नव्हती, तर सुनेने आपल्या भाडेकरू प्रियकरासोबत मिळून केलेला खून होता. विशेष म्हणजे, या हत्येची ब्लू-प्रिंट ३ दिवस आधीच तयार करण्यात आला होत, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

३ महिन्यांचे प्रेम आणि ३ दिवसांचा कट

२१ मार्च रोजी निशातगंज येथील गल्ली नंबर ३ मध्ये ६९ वर्षीय निर्मला देवी यांचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला ही घटना लूटमारीची वाटत होती, कारण अंगावरील दागिने गायब होते. मात्र, डॉग स्क्वाड आणि बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे अवघ्या २४ तासांत सून रंजना आणि तिचा प्रियकर राजन शर्मा यांचा पर्दाफाश झाला. २२ मार्च रोजी पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात धाडले आहे.

आरोपी राजन शर्मा हा ३ वर्षांपूर्वी निर्मला देवी यांच्या घरात भाडेकरू म्हणून आला होता. अवघ्या काही महिन्यांतच घरमालकाची पत्नी रंजना आणि राजन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. या अवैध संबंधांची कुणकुण पती त्रिदेश आणि सासू निर्मला देवी यांना लागली होती, ज्यामुळे घरात रोज भांडणे होत असत. निर्मला देवी आपल्या मुलाची बाजू घेत असल्याने रंजनाला त्या खटकू लागल्या होत्या. ३ दिवसांपूर्वी सासूने स्वतःचे जेवण वेगळे बनवण्यास सुरुवात केली, तेव्हाच रंजना आणि राजनने त्यांना कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला.

हात-पाय बांधून साडीने आवळला गळा

२१ मार्च रोजी जेव्हा पती त्रिदेश वीज विभागाच्या ड्युटीवर गेले होते आणि नातू डिलिव्हरी बॉयच्या कामासाठी बाहेर होता, तेव्हा रंजनाने प्रियकर राजनला बोलावून घेतले. दोघांनी मिळून निर्मला देवी यांचे हात-पाय बांधले आणि साडीने गळा आवळून त्यांची हत्या केली. हत्येनंतर पोलिसांनी याला लूटमार समजावे, या उद्देशाने रंजनाने सासूच्या अंगावरील सर्व दागिने काढून लपवून ठेवले.

सीसीटीव्ही आणि डॉग स्क्वाडने उघडले गुपित

कातिल सून किती चलाख होती, याचा अंदाज यावरून येतो की दुपारी २ ते ४ या वेळेत घरातील सीसीटीव्ही कॅमेरे मुद्दाम बंद करण्यात आले होते. नातू घरी आल्यावर जेव्हा त्याने आजीचा मृतदेह पाहिला, तेव्हा रंजना बाहेरून काहीच माहित नसल्याचे नाटक करत प्रियकरासोबत घरी पोहोचली आणि रडू लागली.

मात्र, पोलिसांच्या 'स्निफर डॉग'ने सर्व डाव उलटवला. श्वान वास घेत थेट गर्दीत उभा असलेल्या प्रियकर राजनजवळ जाऊन थांबला. पोलिसांनी जेव्हा ४ नंतरचे फुटेज तपासले, तेव्हा सून आणि प्रियकर एकत्र घराबाहेर पडताना दिसले, ज्यामुळे पोलिसांचा संशय खात्रीत बदलला. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली साडी आणि लपवलेले दागिने जप्त केले आहेत. निर्मला देवी यांच्या पार्थिवावर भैंसाकुंड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter-in-law's 72-hour plot to kill mother-in-law revealed.

Web Summary : Lucknow: A woman plotted with her tenant lover to murder her mother-in-law. Motive: the mother disapproved of their affair. The crime was planned three days in advance, with the duo using a saree to strangle the victim after tying her up.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश