शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलाने आईला नकोत्या अवस्थेत पाहिलं; मग होत्याचं नव्हतं झालं, औरंगाबादमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 19:11 IST

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील घटना

वैजापूर : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे उघडकीस आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुका हादरला आहे. या निर्दयी मातेने प्रेमापोटी आपल्या कोवळ्या मुलाचा जीव घेतला. सार्थक रमेश बागुल (९) असे मृत मुलाचे नाव आहे. तर संगीता संगीता रमेश बागुल (३५) व तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार (५२, दोघेही, रा. खंडाळा) येथील रहिवासी आहेत. धक्कादायक म्हणजे मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच त्याचा काटा काढला.

वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारातील जंगलातल्या दरीत १७ फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात मृतदेहाचे वय अंदाजे ३५ वर्षांचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले होते. तो मृतदेह पोलिसांनी तलवाडा शिवारात गट नंबर २५१ मधील शेतात पुरून टाकला होता. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केली होती.

दरम्यान, वैजापूर ठाण्यात संगीता बागुल या महिलेने ११ फेब्रुवारीला तिचा मुलगा सार्थक याचे कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार दिली होती. वैजापूर ठाण्याचे एक पथक अपहरणप्रकरणी शिऊर येथे तपास कामी गेले. तेव्हा तलवाडा जंगलात सापडलेल्या त्या मृतदेहाचे कपडे व वैजापूर येथील अपहरण झालेल्या मुलाच्या कपड्यांशी मिळतेजुळते असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुलाच्या आईवडिलांना बोलावून घेतले. त्यानंतर तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीत तलवाडा येथे पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मृतदेहावरील कपडे व चप्पल संगीता बागुल यांना दाखविण्यात आली. त्यांनी हे कपडे मुलगा सार्थकचे असल्याचे सांगितले.

खाक्या दाखवताच दिली कबुली-

पोलिसांना अगोदरच मुलाच्या आईवर संशय होता. मुलाचे प्रेत पाहूनसुद्धा तिला रडू आले नाही. तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करताना तिच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःखाची भावना पोलिसांना जाणवली नाही. त्यामुळे संगीता बागूल हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिला खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. सार्थकची आई संगीता बागुल हिचे गावातीलच साहेबराव पवार याच्याशी अनैतिक संबंध होते. हे संबंध सार्थक याला समजले होते. त्यामुळे या संबंधात अडसर ठरलेल्या मुलाचा काटा काढण्याचा कट दोघांनी रचल्याची संगीताने कबुली दिली.

विषप्राशन केल्याने दुसऱ्या आरोपीवर उपचार-

तलवाडा शिवारात पोलिसांना मृतदेह आढळून आल्याची माहिती घटनेतील दुसरा आरोपी साहेबराव पवार याला मिळताच त्याने विषप्राशन केले. गेल्या दोन दिवसांपासून तो एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी संगीता बागुलला शनिवारी अटक केली. साहेबरावला ताब्यात घेतल्यानंतर खुनाचा अधिक उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि. राम घाडगे, फौजदार रमेश जाधवर, सहायक फौजदार रज्जाक शेख, योगेश वाघमोडे, गोपाळ जानवाल, आर. बी. कवडे यांनी ही कामगिरी केली. वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाची नोंद झाली असून फौजदार गोरख खरड हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण