अल्पवयीन विद्यार्थ्याला अपहरण करून लुटले; नागपूरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 21:51 IST2023-06-13T21:51:29+5:302023-06-13T21:51:40+5:30
वडील त्याला घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्यात गेले. तक्रार दाखल केली.

अल्पवयीन विद्यार्थ्याला अपहरण करून लुटले; नागपूरमधील घटना
नागपूर: अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटल्याची घटना समोर आली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा दहावीचा विद्यार्थी आहे. त्याचे पालक मेस चालवतात. सोमवारी रात्री ८.३० वाजता मुलगा ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कजवळ आईस्क्रीम खायला गेला.
दरम्यान, दोन २० ते २५ वर्षीय तरुणांनी त्याला अडवले. मोबाईल चोरल्याचा आरोप करीत मुलाला जबरदस्तीने वाहनात बसवले आणि प्रतापनगर येथे नेले. तिथे गाडीचे पेट्रोल संपले. मुलाकडून पैसे घेऊन पेट्रोल भरले. त्यानंतर त्याला पारडी येथे नेण्यात आले. संधी पाहून मुलगा तेथून पळून गेला. वडिलांना घटनेची माहिती दिली.
वडील त्याला घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्यात गेले. तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरण आणि लुटमारीचा गुन्हा दाखल केलो. भीतीपोटी त्याने आवाज केला नाही, असे अल्पवयीन मुलाचे म्हणणे आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने घटनेची सत्यता जाणून घेत आहेत.