माधव कॉलनीत व्यापाऱ्याला लुटले, रात्रीच्या थरारानंतर DYSP पोहोचले
By देवेंद्र पाठक | Updated: November 12, 2022 23:27 IST2022-11-12T23:26:12+5:302022-11-12T23:27:09+5:30
ही घटना शहरातील माधव काॅलनीत घडली.

माधव कॉलनीत व्यापाऱ्याला लुटले, रात्रीच्या थरारानंतर DYSP पोहोचले
धुळे : अंधाराचा फायदा घेत मिरचीची पूड फेकून परेश पटेल या व्यापाऱ्याला लुटल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. ही घटना शहरातील माधव काॅलनीत घडली.
घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, चाळीसगाव रोडचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील यानी घटनास्थळी धाव घेतली. लुटीची रक्कम २० ते २५ लाख असल्याची चर्चा आहे.