१२ वीच्या शिक्षणासाठी माहेरी आली अन् नवविवाहित महिला रिक्षावाल्यासोबत पळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:15 PM2023-10-13T15:15:38+5:302023-10-13T15:16:04+5:30

पीडित कुटुंबाने मुलीच्या प्रियकराविरोधात तक्रार नोंद करून कारवाईची मागणी केली आहे.

A married woman ran away with a auto rickshaw driver in Banda, Uttar Pradesh | १२ वीच्या शिक्षणासाठी माहेरी आली अन् नवविवाहित महिला रिक्षावाल्यासोबत पळाली

१२ वीच्या शिक्षणासाठी माहेरी आली अन् नवविवाहित महिला रिक्षावाल्यासोबत पळाली

बांदा – उत्तर प्रदेशच्या बांदा इथं नवविवाहित महिला शाळेत जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली आणि प्रियकरासोबत पळून गेली. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परतली नसल्याने शोधाशोध सुरू झाली तेव्हा हा प्रकार समोर आला. इतकेच नाही तर मुलीने लग्नासाठी घरातले दागिनेही घेऊन पसार झाली. आता बेपत्ता युवतीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत तिच्या प्रियकराविरोधात आरोप केले आहेत. सध्या पोलीस या दोघांचा शोध सुरू आहे. लवकरच दोघांना पकडले जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.

हे प्रकरण बबेरु कोतवाली परिसरातील आहे. जिथे राहणाऱ्या पीडिताने पोलीस तक्रारीत म्हटलंय की, माझ्या मुलीचे २६ मे २०२२ रोजी लग्न झाले होते. मुलगी १२ वीच्या शिक्षणासाठी माहेरी आली होती. पण गावातीलच एका रिक्षावाल्याने मुलीला फसवून पळवून नेले. मुलीने घरातील अडीच लाखाचे दागिनेही सोबत घेऊन गेली. मुलीच्या घरच्यांसह सासरच्यांनी मुलीचा शोध घेतला परंतु अद्याप काही थांगपत्ता लागला नाही.

पीडित कुटुंबाने मुलीच्या प्रियकराविरोधात तक्रार नोंद करून कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा मुलगा युवतीच्या शेजारील घरात राहत होता. दोघे लग्नाच्या आधीपासून एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. त्यात मुलीचे लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. परंतु शिक्षणासाठी माहेरी परतली असताना पुन्हा युवकासोबत तिचा संपर्क झाला. त्यानंतर लग्नासाठी दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पोलीस अधिकारी कुमार सिंह यांनी या प्रकरणाची तक्रार घेत आरोपी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे पथक या दोघांचा शोध घेत आहे. लवकरच दोघांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करू असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Web Title: A married woman ran away with a auto rickshaw driver in Banda, Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.