विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:00 IST2025-07-26T13:00:25+5:302025-07-26T13:00:47+5:30
महिलेच्या एका मित्राने त्याला धमकावत बिल्डिंग खाली बोलावले. त्याची तक्रार काळाचौकी पोलीस स्टेशनला केली होती.

विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
मुंबई - शाळेच्या गेटटूगेदरमध्ये जुने मित्रमैत्रिणी पुन्हा भेटले. त्यातच इतक्या वर्षांनी त्याने तिला पाहिले. तो विवाहित होता आणि तिचेही लग्न झाले होते. मात्र दोघांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाला. त्यातून हळूहळू ते जवळ येऊ लागले. मग आपापल्या पार्टनरला घटस्फोट देत दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पुरुषाने घटस्फोट घेतला आणि मैत्रिणीसोबत लिव्ह इनमध्ये राहायला सुरू केले. परंतु हीच चूक त्याला महागात पडली. जिच्यासाठी त्याने कुटुंब सोडले आणि तिला निवडले, तिनेच सर्वकाही लुटून नेले.
हे प्रकरण मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील आहे. जिथे एका सरकारी कर्मचाऱ्याने वर्गमैत्रिण आणि तिच्या ७ साथीदारांविरोधात अपहरण आणि मारहाणीची तक्रार दिली आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, २००३ मध्ये माझे लग्न झाले होते. त्यानतंर २०१८ साली एका कार्यक्रमात माझी जुनी मैत्रिण भेटली. आमच्या दोघांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाला. त्यानंतर आम्ही एकत्र जीवन जगायचा निर्णय घेतला. त्यातून घरात बरेच वाद झाले परंतु मी २०२१ साली माझ्या पत्नीला घटस्फोट दिला असं त्याने सांगितले.
घटस्फोटानंतर संबंधित व्यक्ती वर्गमैत्रिणीसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. यावेळी महिलेने त्याच्याकडे घर खरेदी करण्यासाठी १५ लाखांची मागणी केली. कुठलाही विचार न करता त्याने ते पैसे महिलेला दिले. त्यानंतर महिला आणि पीडित व्यक्तीमध्ये लग्नावरून संवाद झाला. तू कधी पतीला घटस्फोट देणार आहेस असं त्याने विचारले परंतु महिलेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. या विषयावरून वारंवार वाद होऊ लागले. तेव्हा तिने मला तुझ्या संपत्तीचा वारसदार बनव, वडिलोपार्जित घर माझ्या नावावर कर तेव्हाच मी तुझ्याशी लग्न करेन असं म्हटले त्याला मी स्पष्ट शब्दात नकार दिला असं पीडित व्यक्तीने म्हटले. ऑक्टोबर २०२४ मध्ये पीडित व्यक्ती आणि महिलेने नाते संपवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, २० दिवसांनी महिलेच्या एका मित्राने त्याला धमकावत बिल्डिंग खाली बोलावले. त्याची तक्रार काळाचौकी पोलीस स्टेशनला केली होती. बुधवारी रात्री १० च्या सुमारास महिला तिच्या मित्रासोबत पनवेलला जात होती. तेव्हा प्रियदर्शनी बस स्टॉपजवळ एका दुचाकीने माझ्या कारला कट मारली. याचा विरोध केल्यानंतर महिलेचा मुलगा आणि अन्य तिथे पोहचले. महिलेच्या मुलाने ७-८ लोकांसोबत मिळून मला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. महिला तिथेच हजर होती आणि तिनेही मारहाण सुरू केली. या हाणामारीत माझ्याकडील सोन्याची चेन, घड्याळ, अंगठी, पॉकेट गायब केले असा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याशिवाय माझे अपहरण करून मला रिक्षातून ढकलून दिल्याचा आरोपही त्याने केला आहे.