रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:58 IST2025-07-24T15:57:03+5:302025-07-24T15:58:22+5:30
Bihar Crime News: प्रियकर जेव्हा प्रेयसीला भेटायला गेला तेव्हा चित्र काहीसं वेगळंच होतं...

रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
हल्लीच्या युगात कधी काय घडेल सांगू शकत नाही. प्रेमप्रकरण किंवा विवाहबाह्य संबंध या गोष्टी आणि त्यावरून झालेले गुन्हे सर्रास कानावर येतात. कधी एखादी विवाहित महिला तरूणाच्या प्रेमात पडल्याची बातमी प्रसिद्ध होते तर काही वेळा एखादा विवाहित पुरूष वयाने लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात काहीही करायला तयार असल्याच्या बातम्याही दिसतात. काही वेळा दोन पुरूष आणि महिला दोघेही विवाहित असून आपापल्या साथीदारांना फसवून प्रेमप्रकरण रंगवताना दिसतात. असेच एक विवाह्यबाह्य संबंधांचे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे.
नेमका काय घडला प्रकार?
बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात एका प्रियकराला त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटायला जायचे होते. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी भेट होणार होती. ही घटना काको ब्लॉकच्या भेलावार ओपी परिसरातील रामदानी गावात घडली. रात्री उशिरा प्रियकर हळूच लपूनछपून प्रेयसीला भेटायला गेला. नेहमीच्या ठिकाणी भेटायचं ठरलं. पण जेव्हा प्रियकर प्रेयसीला भेटायला गेला, तेव्हा लोकांनी प्रियकराला रंगेहाथ पकडले
गावकऱ्यांच्या तावडीत सापडला प्रियकर; पोलिसही आले...
प्रियकर गावकऱ्यांच्या तावडीत सापडताच त्याला सर्वांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. शेकडो लोक जमले आणि त्या तरुणाला घरात पकडून ठेवण्यात आले. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण लोक कोणत्याही परिस्थितीत ऐकायला तयार नव्हते. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी यावे लागले. खूप प्रयत्नांनंतर पोलिसांनी गावकऱ्यांच्या तावडीतून प्रियकराची सुटका केली. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही विवाहित असल्याचे चौकशीत समोर आले.
प्रियकराला चोप, रुग्णालयात दाखल
गावकऱ्यांनी प्रियकराला मारहाण करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जहानाबादच्या सदर रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रियकर आणि प्रेयसीमध्ये कथित अवैध संबंध असल्याचे सांगितले जात आहे. गावकऱ्यांना याची आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत चर्चा सुरू आहे.