पोलीस ठाण्यातच रंगला 'प्रेमाचा' आखाडा, एका तरुणावरून दोन तरुणी भिडल्या; कहाणी वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:12 IST2025-04-11T17:11:34+5:302025-04-11T17:12:40+5:30

गुरुवारी सायंकाळी झालेल्या मोठ्या गोंधळानंतर पोलिसांनी या प्रकरणात क्रॉस एफआयआर दाखल करून घेतला आहे.

A 'love' wrestling took place in the police station itself, two young women clashed over a young man; you will be shocked after reading the story | पोलीस ठाण्यातच रंगला 'प्रेमाचा' आखाडा, एका तरुणावरून दोन तरुणी भिडल्या; कहाणी वाचून चक्रावून जाल

पोलीस ठाण्यातच रंगला 'प्रेमाचा' आखाडा, एका तरुणावरून दोन तरुणी भिडल्या; कहाणी वाचून चक्रावून जाल

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधून एक धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. येथे प्रेमावरून पोलीस ठाण्यातच जोरदार आखाडा रंगला. शहरातील शाहजहानाबाद पोलीस ठाण्याच्या आवारात एकाच तरुणावरून दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे, यातील एका मुलेचे संबंधित तरुणासोबत लग्न ठरले असून त्यांचा साखरपुडाही झाला आहे.

तरुणाचे ठरले आहे लग्न -
खरेतर, गुरुवारी एका तरुणीने शहरातील शाहजहानाबाद पोलीस ठाणे गाठले आणि एक अर्ज दिला. यात तिने सांगितले की, तिचे एका तरुणासोबत लग्न ठरले असून त्यांचा साखरपुडाही झाला आहे. आता आपल्या होणाऱ्या पतीच्या घराशेजारी राहणारी एक मुलगी, त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. मी तिला अनेकवेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकत नाही.

पोलीस ठाण्यात हाणामारी - 
या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी दुसऱ्या तरुणीना समजावून सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले. संबंधित तरुणी तिच्या कुटुंबासह पोलीस ठाण्यात पोहोचली. हा वाद सोडवण्यासाठी चर्चा सुरू असतानाच, दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरू झाला. याचे पर्यवसान काहीक्षणातच हाणामारीत झाले. यानंतर, दोन्ही पक्षांच्या कुटुंबातील सदस्यांमध्येही हाणामारी झाली.

दुसऱ्या तरुणीचा तरुणावर आरोप... -
दरम्यान, या प्रकरणावर बोलताना दुसरी तरुणी म्हणाली, आपण त्या तरुणाशी बोलत नाही. ना त्याला त्रास देतो. उलट, संबंधित तरुणच आपल्या मागे लागला आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या मोठ्या गोंधळानंतर पोलिसांनी या प्रकरणात क्रॉस एफआयआर दाखल करून घेतला आहे.

Web Title: A 'love' wrestling took place in the police station itself, two young women clashed over a young man; you will be shocked after reading the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.