मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:00 IST2025-06-17T19:00:42+5:302025-06-17T19:00:50+5:30

दोन मित्र असेच एकमेकांची टर्र उडवत होते. यावेळी एकाने दुसऱ्याची मस्करी केली, म्हणून त्याने काहीशा रागात त्याच्या छातीवर ठोसे लगावले.

A joke turned into a nightmare! A friend punched him for teasing him, he died in the hospital | मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मस्करी मस्करीत एखाद्याला दुखापत झाल्याचे व्हिडीओ आपण नेहमी पाहत असतो. शॉर्ट, रील्समध्ये तर सोशल मीडियावर याचा महापूरच आहे. परंतू, हरियाणामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर त्यामुळे दुसऱ्या तरुणाला आता पोलीस चौकशी, कोर्टकचेरी आणि मग झालीच तर शिक्षा या सगळ्याला सामोरे जावे लागणार आहे. 

दोन मित्र असेच एकमेकांची टर्र उडवत होते. यावेळी एकाने दुसऱ्याची मस्करी केली, म्हणून त्याने काहीशा रागात त्याच्या छातीवर ठोसे लगावले. ते जोरात लागल्याने १८ वर्षांचा तरुण जागीच बेशुद्ध पडला. त्या मित्राने त्याला हॉस्पिटलला नेले परंतू उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. छातीमध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. यावरून आता भोंडशी पोलिसांनी गिरधारी नावाच्या तरुणाला आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे.  

आदेश नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो १२ वीची परीक्षा पास झाला आहे, पुढची तयारी करत होता. गिरधारी आणि आदेश हे दोघे मित्र होते. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास, आदेश आणि गिरधारी हे त्यांच्या इतर मित्रांसोबत हास्यविनोद करत होते. विनोदावरून त्यांच्यात वाद झाला आणि गिरधारीने आदेशला मारहाण केली. छातीवर ठोसा मारल्याने आदेश बेशुद्ध पडला. इतर मित्रांनी मिळून त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात नेले. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

आदेशला मारण्याच्या उद्देशाने मारहाण झालेली नव्हती, परंतू त्यात त्याचा जीव गेला आहे. यामुळे एखाद्याची थट्टा मस्करी करतानाही जपून करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. गिरधारीला पोलिसांनी ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आता गिरधारीला तुरुंगात जावे लागणार आहे. 

Web Title: A joke turned into a nightmare! A friend punched him for teasing him, he died in the hospital