खोली विण्याच्या वादातून पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला; पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 20:50 IST2022-08-03T20:49:57+5:302022-08-03T20:50:28+5:30
A husband fatally attacked his wife : तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आरोपी पती विरोधात साडूने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

खोली विण्याच्या वादातून पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला; पत्नी गंभीर जखमी
नितिन पंडीत
भिवंडी : राहती खोली विण्यावरून होत असलेल्या सततच्या वादातून पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करून पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील गैबीनगर परिसरात मंगळवारी घडली आहे.पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आरोपी पती विरोधात साडूने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नुरजाहाँ रियाजउद्दीन शेख वय ३८,रा.गैबी नगर असे पतीच्या हल्ल्यात जखमी असलेल्या पत्नीचे नाव आहे. तर रियाजउद्दीन जहीरूद्दीन शेख वय- ५३ वर्षे असे गुन्हा दाखल झालेल्या माथेफिरू पतीचे नाव आहे. नूरजहाँ व रियाजुद्दीन हे गैबी नगर परिसरात एका खोलीत राहत असून राहती खोली विकण्याचा चंग पती रियाजुद्दीन याने बांधला होता मात्र त्यास पत्नीचा विरोध होता. यावरून दोघा पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते या वादाचे पर्यावसन गंभीर मारहाणीत हिट पती रियाजुद्दीन याने चाकूने पत्नीच्या पोटावर, दोन्ही हातांवर व ओठाचे दोन्ही बाजुस वार करून गंभीर जखमी करून तिला जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला असल्याने या प्रकरणी यव्ह इमारतीत राहणारा रियाजुद्दीन याचा साडू अरिफ रऊफ शेख वय ३८ वर्षे याने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी पती रियाजुद्दीन यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे.