धक्कादायक! फिरायला गेलेल्या तरुणीचं आधी अपहरण, मग बलात्कार त्यानंतर गूढ हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 14:24 IST2022-11-29T14:24:31+5:302022-11-29T14:24:48+5:30

आरोपींनी बलात्कार केल्यानंतर हत्या केली आणि मृतदेहाची ओळख न पटावी यासाठी एसिडने जाळून टाकलं असं कुटुंबीयांना वाटतं. 

A girl who went for travel, first kidnapped, then raped and then mysteriously killed in Odisha | धक्कादायक! फिरायला गेलेल्या तरुणीचं आधी अपहरण, मग बलात्कार त्यानंतर गूढ हत्या

धक्कादायक! फिरायला गेलेल्या तरुणीचं आधी अपहरण, मग बलात्कार त्यानंतर गूढ हत्या

ओडिशाच्या पुरी भागात समुद्र किनारी एका युवतीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली. ही युवती मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील रहिवासी होती. मृत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या युवतीची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केलीय. तर पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

कुटुंबीयांनी आरोप केलाय की, मुलीचं २३ नोव्हेंबरला हॉटेलमधून अपहरण करण्यात आले त्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला आहे. बलात्कारानंतर मुलीची हत्या झालीय. मात्र पोलिसांना युवतीचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय आहे. बेपत्ता झाल्यानंतर ३ दिवसांनी २६ नोव्हेंबरला मुलीचा मृतदेह पुरी येथील पेंटाकाटा परिसरात सापडला. 

पोलिसांच्या माहितीनुसार, युवतीचा मृतदेह पूर्ण काळा पडला होता. तिच्यावर कुणीतरी एसिड फेकल्यासारखं वाटतं. मात्र त्यावर अद्याप काही सांगता येणे कठीण आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात जास्त काळ राहिल्यामुळेही मृतदेह काळा पडला असू शकतो. कारण शरीर पाण्याच्या बाजूने तरंगताना आढळलं असं त्यांनी सांगितले. मात्र कुटुंबाने या घटनेनंतर पोलिसांवर दबाव बनवला आहे. आरोपींनी बलात्कार केल्यानंतर हत्या केली आणि मृतदेहाची ओळख न पटावी यासाठी एसिडने जाळून टाकलं असं कुटुंबीयांना वाटतं. 

त्यासोबतच ओडिशा पोलीस असो वा भोपाळ पोलीस आमची कुणीही मदत करत नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या डोक्यावर असलेल्या जखमेकडे लक्ष न देता हा सामान्य मृत्यू असल्याचं म्हटलं असा दावा मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तर पोलिसांनी पोस्टमोर्टमनंतर मुलीचा मृतदेह समुद्रकिनारी सापडल्याचं कळवलं होते असं मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले. आमच्या मुलीला न्याय मिळावा आणि जे कुणी दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मृत मुलीच्या वडिलांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"


 
 

Web Title: A girl who went for travel, first kidnapped, then raped and then mysteriously killed in Odisha