लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:19 IST2024-03-05T14:19:08+5:302024-03-05T14:19:20+5:30
याप्रकरणी नवरीसह सात जणांना कुडाळ पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक
कुडाळ : लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन पुरुष व चार महिलांना कुडाळ पोलिसांनी अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणातील चौघांना ताब्यात घेतले आहे.
संशयित टोळीने कुडाळ तालुक्यातील एकाचे लग्न लावून त्यानंतर नवरीने पळून जात नवरी व तिचे नातेवाईक यांनी सुमारे १ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
याप्रकरणी नवरीसह सात जणांना कुडाळ पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.