पार्टी सोडून जाणे पडले महागात! मित्रानेच मित्राच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली
By नितीन पंडित | Updated: December 19, 2022 17:23 IST2022-12-19T17:21:23+5:302022-12-19T17:23:10+5:30
या प्रकरणी प्रवीण गायकवाड याने दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलीस ठाण्यात करण पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पार्टी सोडून जाणे पडले महागात! मित्रानेच मित्राच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली
भिवंडी- भिवंडीत मित्रांनी दारू पार्टी ठेवली असता ती पार्टी अर्धवट सोडून जाणे एका तरुणाला महागात पडले आहे. पार्टी सोडून गेल्याने एका मित्राने त्याच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील पिंपळनेर गावाच्या हद्दीतील प्रवीण गायकवाड हे आपल्या मित्रांसोबत आयोजित केलेली पार्टी अर्धवट सोडून आपल्या मामे भावासह निघून गेल्याने पार्टीतील मित्र करण हरिदास पाटील यास राग आला. या रागात त्याने प्रवीण गायकवाड यास रस्त्यात गाठून पार्टी अर्धवट का सोडून गेला? असे विचारत शिवीगाळ केली व त्याच्या डोक्यात बियारची बाटली फोडून त्याला जखमी केले. या प्रकरणी प्रवीण गायकवाड याने दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलीस ठाण्यात करण पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे.