प्रेमप्रकरणावरून संतापलेल्या बापानं पोटच्या मुलीलाच संपवलं, मग आत्महत्या दाखवण्यासाठी भलतंच नाटक रचलं; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:04 IST2025-08-30T16:03:38+5:302025-08-30T16:04:21+5:30

गावातील पोलीस ठाण्याला १८ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

A father, enraged by a love affair, killed his own daughter, then staged a fake drama to show her suicide but | प्रेमप्रकरणावरून संतापलेल्या बापानं पोटच्या मुलीलाच संपवलं, मग आत्महत्या दाखवण्यासाठी भलतंच नाटक रचलं; पण...

प्रेमप्रकरणावरून संतापलेल्या बापानं पोटच्या मुलीलाच संपवलं, मग आत्महत्या दाखवण्यासाठी भलतंच नाटक रचलं; पण...

कर्नाटकातील कलबुर्गी येथून एक धक्कादायक घठना समोर आली आहे. येथे मुलीच्या प्रेमप्रकरणावरून संतापलेल्या एका बापाने तिची हत्या केली आणि ही हत्या लपवण्यासाठी त्याने, मृत मुलीच्या तोंडात कीटकनाशक टाकले. यानंतर हत्येला आत्महत्या भासवून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कलबुर्गी जिल्ह्यातील मेलाकुंडा गावात घडली. गावातील पोलीस ठाण्याला १८ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

यासंदर्भात कलबुर्गी पोलीस आयुक्त शरणप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात पोहोचून तपासाला सुरुवात केली. यानंतर, लोकांकडून मिळालेली माहिती आणि पुराव्यांच्या आधारे त्यांनी पुष्टी केली आहे की, मुलीचे दुसऱ्या समाजाच्या तरुणावर प्रेम होते. यामुळे तिचे वडील नाराज होते. त्यांनी नातलगांकडून आणि स्वतःही मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी तिच्या प्रेमप्रकरणावर ठाम होती.

शरणप्पा यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीला पाच मुली आहेत. त्याला भीती होती की, त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेमप्रकरण असल्यास त्यांच्या इतर तीन मुलींच्या लग्नात अडचणी येतील. यामुळे त्याने तिची हत्या केली आणि आत्महत्या दर्शवण्यासाठी तिच्या तोंडात कीटकनाशक टाकले. गावकऱ्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि  ते अंत्यसंस्कारात सहभागी झाले. मृत तरुणीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.

शरणप्पा पुढे म्हणाले, "अधिक पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमसह पोलीस पथक पाठवण्यात आले आहे. वडिलांविरुद्ध पुराव्यांशी छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येत आणखी दोन नातेवाईकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. असे काही आढळ्यास, त्यांनाही अटक करण्यात येईल."

Web Title: A father, enraged by a love affair, killed his own daughter, then staged a fake drama to show her suicide but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.