माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:37 IST2025-10-29T12:36:20+5:302025-10-29T12:37:03+5:30
हा हल्ला झाला तेव्हा ते आपल्या खोलीत झोपले होते. झोपेत असतानाच अचानक त्यांचा मुलगा, सून आणि पत्नी खोलीत घुसले अन्..

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. संपत्तीच्या वादाने रक्ताच्या नात्यालाही काळिमा फासला आहे. जिल्ह्यातील मझोला पोलीस स्टेशन हद्दीत, शंकर लाल नावाच्या एका ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्याच मुलगा, सून आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. घरात सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादातून हे क्रूर कृत्य करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
झोपेत असताना तिघांनी केला हल्ला
पीडित शंकर लाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, हा हल्ला झाला तेव्हा ते आपल्या खोलीत झोपले होते. झोपेत असतानाच अचानक त्यांचा मुलगा, सून आणि पत्नी खोलीत घुसले. तिघांनी मिळून कोणतीही दयामाया न दाखवता शंकर लाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या खिशात असलेले पैसेही काढून घेण्यात आले.
पत्नीनेच केले घृणास्पद कृत्य
मारहाण केल्यानंतर शंकर लाल यांना त्यांच्या पत्नीने ओढत खोलीत नेले आणि त्यानंतर जे केले, त्याने माणुसकीलाही लाज वाटेल. शंकर लाल यांचा आरोप आहे की, त्यांच्या पत्नीने ब्लेडने थेट त्यांच्या गुप्तांगावर वार केला. या भयानक हल्ल्यामुळे शंकर लाल गंभीर जखमी झाले आणि प्रचंड वेदनेने विव्हळून तेथेच बेशुद्ध पडले.
शेजाऱ्यांमुळे वाचला जीव, पोलिसांकडून तातडीने मदत
शंकर लाल यांच्या किंकाळ्या ऐकून शेजारील लोक तातडीने त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले आणि लगेच पोलिसांना माहिती दिली. मझोला पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शंकर लाल यांची गंभीर अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना तातडीने मुरादाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.
संपत्तीचा वादच ठरला हल्ल्याचे कारण
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शंकर लाल यांनी पोलिसांना सांगितले की, मालमत्तेच्या वाटणीवरून घरात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून कट रचून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांनी तिन्ही आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणावर एसपी सिटी कुमार रण विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पीडित शंकर लाल यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही," असे आश्वासन त्यांनी दिले आहे.