किराणा दुकानातून दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
By रवींद्र देशमुख | Updated: July 23, 2023 18:38 IST2023-07-23T18:38:25+5:302023-07-23T18:38:41+5:30
याप्रकरणी महिलेवर पोलिंसानी गुन्हा दाखल करत कारवाई केली. येथून जवळपास एक हजार चारशेची दारू जप्त केली.

किराणा दुकानातून दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
मंगळवेढा : तळसंगी येथील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या किराणा दुकानावर पोलिसांनी छापा टाकून १४०० रुपयांची दारू जप्त करीत दारू विक्रेत्या रूपाली विजय महानूर (वय ३१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची हकीकत अशी, सहायक पोलिस निरीक्षक बापूसाे पिंगळे, पोलिस हवालदार महेश कोळी यांनी तळसंगी येथील बबलू किराणा स्टोअर्समध्ये रूपाली महानूर या पिशवीमध्ये बेकायदेशीररीत्या दारू ठेवून त्याची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सदर दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी महिलेवर पोलिंसानी गुन्हा दाखल करत कारवाई केली. येथून जवळपास एक हजार चारशेची दारू जप्त केली.
दरम्यान, ग्रामीण भागात हटभट्ट्यांवर मोठया प्रमाणावर छापे टाकून दारू नष्ट केली जात आहे. शिवाय महामार्गावरील ढाब्यावरही छापे टाकून अटकेची कारवाई होत आहे, या स्थितीत किराणा दुकानात दारू विक्री करण्याच्या अपराधाला पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे.