विनयभंग प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 17:10 IST2022-10-02T17:08:14+5:302022-10-02T17:10:33+5:30
विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेला गणेश परब दक्षिण गोव्यात असलेल्या मुरगाव तालुक्यातील हार्बर कोस्टल पोलीस स्थानकावर उपनिरीक्षक म्हणून ड्युटीवर रुजू आहे.

विनयभंग प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद
वास्को - निवृत्तीसाठी तीन महीने राहीलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणेश परब (वय ५९) यांनी एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुरगाव पोलीसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेला गणेश परब दक्षिण गोव्यात असलेल्या मुरगाव तालुक्यातील हार्बर कोस्टल पोलीस स्थानकावर उपनिरीक्षक म्हणून ड्युटीवर रुजू आहे.
मुरगाव पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि.१) उशिरा रात्री त्या पिडीत महीलेने विनयभंगाची तक्रार नोंदवली. हार्बर कोस्टल पोलीस स्थानकावर उपनिरीक्षक म्हणून रुजू असलेला गणेश परब शुक्रवारी (दि.३०) दुपारी मित्राला भेटण्यासाठी गेला. तेथे त्यांने मित्राबरोबर मिळून मद्यपान केल्याचा संशय पोलीस व्यक्त करित आहेत. त्यानंतर गणेश परब याने बोगदा स्मशानभूमी जवळील परिसरात ज्या ठीकाणी ती पीडित महीला राहत होती त्या खोलीत घुसून त्यांने तिच्यावर विनयभंग केला असे तिने तक्रारीत कळविल्याची माहिती मुरगाव पोलिसांनी दिली.
विनयभंग प्रकरणात मुरगाव पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश परब विरुद्ध भादस ३५४, ४४८ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. विनयभंग प्रकारणात गुन्हा नोंद झालेला गणेश परब बोगदा येथील ‘पोलीस कोर्टस’ वसाहतीत राहतो अशी माहिती पोलिसांनी दिली. विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेल्या गणेश परब याला पोलीस सेवेतून निवृत्त होण्यास फक्त तीन महीने राहीले आहेत. मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.