नग्न व्हिडीओ नातेवाईकांकडे प्रसारित करत तरूणीची बदमानी, तरुणावर गुन्हा दाखल
By रूपेश हेळवे | Updated: April 20, 2023 17:38 IST2023-04-20T17:37:50+5:302023-04-20T17:38:09+5:30
फिर्यादी नुसार, आरोपी शुभम याने पीडित तरुणीला जुलै २०२२ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून आपल्या राहत्या घरी नेऊन मसाला पानात गुंगीचे औषध दिले. त्यानंतर जबरदस्तीने अत्याचार केला.

नग्न व्हिडीओ नातेवाईकांकडे प्रसारित करत तरूणीची बदमानी, तरुणावर गुन्हा दाखल
सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवत तरूणीला खाण्याच्या मसाला पानातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार करत तिचे नग्न व्हिडीओ नातेवाईकांमध्ये प्रसारित करून तिची बदनामी केल्याप्रकरणी शुभम गौतम शिंगे (रा. सोलापूर) या तरुणावर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नुसार, आरोपी शुभम याने पीडित तरुणीला जुलै २०२२ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून आपल्या राहत्या घरी नेऊन मसाला पानात गुंगीचे औषध दिले. त्यानंतर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच जुलै ते सप्टेंबर २०२२ दरम्यान तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. १५ ते १८ एप्रिल पर्यंत सर्व फोटो व व्हिडिओ फिर्यादी तिच्या नातेवाईकांकडे पाठवण्याची धमकी देत दोन लाखाची मागणी केली. पण पीडितेने पैसे न दिल्याने आरोपीने ते व्हिडीओ व फोटो नातेवाकांच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केली. या प्रकरणी पीडित १९ वर्षिय तरुणीने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून शुभम शिंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.