शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 21:59 IST

पूनम नावाच्या ४५ वर्षीय महिलेचे तिच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान असलेल्या कृष्ण कुमार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते.

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पूनम नावाच्या ४५ वर्षीय महिलेचे तिच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान असलेल्या कृष्ण कुमार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. पूनमच्या पतीला, अनूप सिंह यादवला, या संबंधांबद्दल संशय आल्याने त्याने आक्षेप घेतला आणि दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला. याच कारणावरून पूनमने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. 

हत्येनंतर, या घटनेला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर संपूर्ण सत्य समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिला पूनम आणि तिचा प्रियकर कृष्ण कुमार या दोघांना अटक केली आहे.

गोहाणा येथे आढळला मृतदेहझुंझुनू येथील गोहाणा परिसरातील पचेरी रोडवर १० जूनच्या रात्री एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख अनूप सिंह यादव अशी पटली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अनूपच्या मुलीने सुरुवातीला वडिलांच्या मृत्यूचा अहवाल रस्ते अपघातामुळे झाल्याचे नोंदवले होते. चौकशीदरम्यान, पोलिसांनी अनूपची पत्नी, ४५ वर्षीय पूनम हिची कसून चौकशी केली. यासोबतच, पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे गोळा केले, ज्यांच्या आधारे पूनमचा प्रियकर कृष्ण कुमार याला अटक करण्यात आली.

क्रूर हत्येचे रहस्य उलगडले!पोलिसांनी पूनम आणि तिचा प्रियकर कृष्ण कुमार यांची कसून चौकशी केली असता, संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. दोघांनी पोलिसांना सांगितले की, १० जून रोजी अनूप घरी पोहोचला. रात्री तो फिरायला बाहेर पडला. रस्त्यात त्याची कृष्ण कुमारशी भेट झाली आणि अनूपने कृष्ण कुमारला दारू पिण्यास बोलावले. त्यानंतर दोघांनी दारू पार्टी केली. दारूच्या नशेत असतानाच कृष्ण कुमारने अनूपच्या छातीवर लोखंडी हातोड्याने वार केले आणि बेदम मारहाण केली, ज्यामुळे अनूपचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कृष्ण कुमारने अनूपचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि तिथून पसार झाला. या संपूर्ण घटनेला अपघात भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

प्रेमसंबंध आणि हत्येचे कारणपोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, कृष्ण कुमार हा पूनमपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. तो महिलेच्या घरी टँकरने पाणी पुरवण्याचे काम करत होता. २०१८ मध्ये पूनम आणि कृष्ण कुमार यांची भेट झाली होती. त्यावेळी कृष्ण कुमार २४ वर्षांचा होता. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि हळूहळू त्यांचे प्रेमसंबंध जुळले.

अनूप घरी नसताना कृष्ण कुमार पूनमच्या घरी येऊ लागला. पोलिसांनी सांगितले की, पूनम आणि कृष्ण कुमार यांच्यात सात वर्षांपासून अनैतिक संबंध होते. कृष्ण कुमारचे सध्याचे वय अंदाजे ३१ वर्षे आहे. पूनमशी त्याची भेट झाली तेव्हा तो २४ वर्षांचा होता. गेल्या चार महिन्यांपासून अनूपने नोकरी सोडून घरीच राहत होता. यामुळे कृष्ण कुमार आणि पूनमला भेटण्यात अडचणी येत होत्या.

काही काळापूर्वी अनूपला पूनम आणि कृष्ण कुमारच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती मिळाली. यावर अनूपने जोरदार विरोध केला. यामुळे पूनम आणि अनूपमध्ये रोजच वाद होऊ लागले. पूनमने आपल्या प्रियकर कृष्ण कुमारसोबत मिळून अनूपला वाटेतून बाजूला करण्याचा कट रचला. पोलीस तपासात समोर आले की, ९ जून रोजी पूनम आणि कृष्ण कुमारने अनूपला संपवण्याची योजना तयार केली आणि १० जून रोजी त्यांनी या घटनेला अंमलात आणले.

पोलिसांनी पूनम आणि तिचा प्रियकर कृष्ण कुमार यांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडीत पाठवले आहे. पोलिसांनी चौकशीनंतर अनूपच्या हत्येसाठी वापरलेला हातोडाही जप्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानhusband and wifeपती- जोडीदार