माता न तू वैरिणी... पैशांसाठी आईनेच केला पोटच्या मुलीच्या शरीरविक्रयाचा सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 12:58 IST2024-10-25T12:57:56+5:302024-10-25T12:58:37+5:30

१३ वर्षीय मुलीला दोन लाखांसाठी केलं प्रवृत्त, मीरा रोड भागातील घटना

A 13-year-old girl was forced into prostitution by her mother for money in Mira Road | माता न तू वैरिणी... पैशांसाठी आईनेच केला पोटच्या मुलीच्या शरीरविक्रयाचा सौदा

माता न तू वैरिणी... पैशांसाठी आईनेच केला पोटच्या मुलीच्या शरीरविक्रयाचा सौदा

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: एका आईने स्वत:च्या १३ वर्षीय मुलीला दोन लाख रूपयांसाठी शरीरविक्रयास प्रवृत्त करण्याची धक्कादायक घटना मीरा रोड भागात समोर आली. या मुलीचा दोन लाखांत सौदा करणाऱ्या तिच्या आईसह महिला दलालावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघींनाही अटक झाली आहे. पोलिसांनी बोगस ग्राहकामार्फत सापळा रचून हाटकेश रस्त्यावरील एका हॉटेलात ही कारवाई केली. यामध्ये महिला दलाल शबिनाझ साजिद सय्यद  (३५, रा. साई प्रसाद, प्लेझंट पार्क, मीरारोड) हिच्यासह आईला अटक करण्यात आली आहे.

Web Title: A 13-year-old girl was forced into prostitution by her mother for money in Mira Road