मानखुर्द बालगृहातून ९ वर्षीय मुलगा बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 20:38 IST2018-12-22T20:21:27+5:302018-12-22T20:38:07+5:30
तो नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरही त्याचा दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा पत्ता न लागल्याने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मुलाचा शोध घेत आहेत.

मानखुर्द बालगृहातून ९ वर्षीय मुलगा बेपत्ता
ठळक मुद्दे9 वर्षांचा मुलगा बुधवार सकाळपासून बेपत्ता झाल्याने खळबळ माजलीमंगळवारी त्या मुलाला बालगृहात आणण्यात आले होते.बुधवारी सकाळी हजेरी घेतली तेव्हा तो मुलगा गायब होता
मुंबई - न्यायालयाच्या आदेशानुसार मानखुर्द येथील बालगृहात ठेवण्यात आलेला 9 वर्षांचा मुलगा बुधवार सकाळपासून बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी त्या मुलाला बालगृहात आणण्यात आले होते. बुधवारी सकाळी हजेरी घेतली तेव्हा तो मुलगा गायब होता. नंतर त्या मुलास बालगृहात शोधण्यात आले. मात्र तो नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरही त्याचा दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा पत्ता न लागल्याने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मुलाचा शोध घेत आहेत.