लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये 9 लाखाची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 15:16 IST2019-04-24T15:14:56+5:302019-04-24T15:16:15+5:30
स्विफ्ट गाडीतून ही रोकड जप्त करण्यात आली आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये 9 लाखाची रोकड जप्त
वैभव गायकर
पनवेल - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. पनवेलमध्ये सुमारे 9 लाखाची रोकड आचारसंहिता पथकाने मंगळवारी रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी उरण नाका परिसरातून जप्त केली आहे .एमएच .06, एएस .8801 या स्विफ्ट गाडीतून ही रोकड जप्त करण्यात आली आहे.
या रक्कमेत 500 रुपयाच्या सुमारे 1800 नोटाचा समावेश आहे. रवी सोनकर व दीपक सोनकर यांच्याकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. पनवेल मधील कारंजाडे येथून नवीन पनवेलला जात असताना उरण नाका परिसरात सुरु असलेल्या तपासणीवेळी पनवेल आचारसंहिता पथकाच्या हाती ही रोकड लागली. आचारसंहिता सर्वेक्षण पथक प्रमुख राजीव डोंगरे, पोलीस शिपाई सुहास माळी तसेच महिला पोलीस शिपाई कविता आव्हाड यांच्यसह इतर सदस्यांनी पनवेल आचारसंहिता पथक प्रमुख जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. संबंधित रक्कम पनवेल शहर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली असल्याची माहिती लेंगरेकर यांनी दिली. संबंधित रक्कमेचे पुरावे सादर करण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत. संबंधित अहवाल जिल्हाधिकारी रायगडला सादर करणार आहोत अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली.