मीरा रोडमधून ९ बांग्लादेशींना अटक; २ महिला व १ अल्पवयीनचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 08:54 PM2021-11-15T20:54:52+5:302021-11-15T20:56:05+5:30

गेल्या काही महिन्या पासून हे शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीर रित्या राहून मजुरी आदी कामे करत होते.

9 bangladeshis arrested from Mira Road Includes 2 women and 1 minor | मीरा रोडमधून ९ बांग्लादेशींना अटक; २ महिला व १ अल्पवयीनचा समावेश 

मीरा रोडमधून ९ बांग्लादेशींना अटक; २ महिला व १ अल्पवयीनचा समावेश 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंप जवळ धाड टाकून ९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून त्यात २ महिला व १ अल्पवयीनचा समावेश आहे . या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली केशव शिंदे , उमेश पाटील , रामचंद्र पाटील, सुप्रिया तिवले , सम्राट गावडे यांच्या पथकाने शनिवारी जुन्या पेट्रोल पंप , गोविंद नगर परिसरात जमलेल्या ९ बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली . 

गेल्या काही महिन्या पासून हे शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीर रित्या राहून मजुरी आदी कामे करत होते असे पोलीस चौकशीत सकृतदर्शनी आढळले आहे . सलीम जल्लाउद्दीन शेख (२१) ; रकीब जल्लाउद्दीन शेख (१५) ; मो. आसाद, ईलादी मुल्ला (५५) ; रुमान तानुज शेख (२६) ; जाकीर ईस्साहक्क हवलदार हुसेन (५०) ; पारुल बिजाई दास (५०) ; वजीर खल्लीद शेख (५०) ; खुर्शीदा वजीर शेख (३७) ; कालम मतलब मुल्ला (५०) अशी अटक बांग्लादेशींची नावे आहेत . नया नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: 9 bangladeshis arrested from Mira Road Includes 2 women and 1 minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.