8 lakh 17 thousand rupees suspected amount seized | धारावीत 8 लाख 17 हजार रुपयांची संशयित रक्कम जप्त
धारावीत 8 लाख 17 हजार रुपयांची संशयित रक्कम जप्त

ठळक मुद्देधीरेन कांतीलाल छेडा वय 42 राहणार घाटकोपर (पूर्व) यांच्याकडे सदर वाहनात ही रक्कम आढळून आली.माहिती 178-धारावी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली.

मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यात धारावी भागात आज सकाळी दहा वाजता निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे 8 लाख 17 हजार रुपये इतकी संशयित रक्कम पकडली.

आज सकाळी 10 वाजता सायन जंक्शनजवळ वाहन क्र. MH-04, HX-1916 पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा या वाहनाची तपासणी केला असता धीरेन कांतीलाल छेडा वय 42 राहणार घाटकोपर (पूर्व) यांच्याकडे सदर वाहनात ही रक्कम आढळून आली.
याबाबत धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस डायरी क्र. 21/2019, दिनांक 9/10/2019 अन्वये नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती 178-धारावी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली.


Web Title: 8 lakh 17 thousand rupees suspected amount seized
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.