एका महिन्यात चोरीस गेलेले ७७ मोबाईल पोलिसांनी केले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 21:06 IST2019-09-03T21:02:50+5:302019-09-03T21:06:12+5:30

मोबाईल आज पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले.

77 mobiles return by police which were stolen within one month | एका महिन्यात चोरीस गेलेले ७७ मोबाईल पोलिसांनी केले परत

एका महिन्यात चोरीस गेलेले ७७ मोबाईल पोलिसांनी केले परत

ठळक मुद्देकल्याण परिमंडळ तीन अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्कॉड तयार करण्यात आले. महागडे ७७ मोबाईल ज्याची किंमत सुमारे साडे दहा लाख रुपये आहे असे मोबाईल

कल्याण - एका महिन्यात चोरी गेलेले सुमारे साडे दहा लाखाचे मोबाईल कल्याण अँटी मोबाईल स्नेचिंग स्कॉडने हस्तगत करीत  हे मोबाईल आज नागरिकांना परत करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्कॉड तयार करण्यात आले. या स्कॉडने एका महिन्यात यशस्वी कामगिरी करत नागरिकांचे चोरी गेलेलं महागडे ७७ मोबाईल ज्याची किंमत सुमारे साडे दहा लाख रुपये आहे असे मोबाईल आज पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले.

Web Title: 77 mobiles return by police which were stolen within one month