नर्‍हे येथे दरोड्याच्या तयारीने एकत्र आलेल्या ७ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:50 IST2020-06-15T16:47:06+5:302020-06-15T16:50:31+5:30

घातक शस्त्रे, मिरची पुड, दोरी, बॅटरी, मोबाईल फोन व मोटारसायकल असा ५ लाख ८४ हजार ५२० रुपयांचा माल जप्त

7 person arrested who coming together for robbery in Narhe | नर्‍हे येथे दरोड्याच्या तयारीने एकत्र आलेल्या ७ जणांना अटक

नर्‍हे येथे दरोड्याच्या तयारीने एकत्र आलेल्या ७ जणांना अटक

ठळक मुद्देअधिक तपासासाठी २ दिवस पोलीस कोठडी मंजूर

पुणे : नर्‍हे येथे दरोड्याच्या तयारीने एकत्र आलेल्या ७ जणांच्या टोळक्याला सिंहगड रोड पोलिसांनीअटक केली आहे. रोहित प्रकाश पोकळे (वय २८, रा. गणेश पेठ), अमित धनंजय बोराटे (वय २५, रा. गुरुवार पेठ), भूषण रमेश मोहिते (वय ३७, रा. बेनकर वस्ती, धायरी) संदीप संजय दुबे (वय २५, रा. शुक्रवार पेठ), शुभम राजेश पवार (वय २५, रा. गणेश पेठ), सागर बाळासाहेब टिळेकर (वय २३, रा. गंज पेठ), अभिषेक संतोष पन्हाळे (वय २१, रा. गंज पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई धायरी रोडवरील नर्‍हे येथील ऑपलोन्स सोसायटीसमोर सोमवारी रात्री दीड वाजता करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस नाईक सचिन तनपुरे यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण धायरी रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीनुसार एकत्र आले होते. त्यांनी तेथून जाणार्‍या एका टेम्पोचालकाला मारहाण करुन लुटले होते. याची माहिती मिळाल्यावर सिंहगड रोड पोलिसांनी रात्री सापळा रचला. या टोळक्याला पकडले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे, मिरची पुड, दोरी, बॅटरी, मोबाईल फोन व मोटारसायकल असा ५ लाख ८४ हजार ५२० रुपयांचा माल जप्त केला आहे.
या सर्वांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी २ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 7 person arrested who coming together for robbery in Narhe