७ कोटी, ७ आरोपी! मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांचा ढीग केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 21:10 IST2022-01-26T21:09:32+5:302022-01-26T21:10:39+5:30
Fake 2000 rupees notes Rs.7,00,00,000 caught by mumbai police :मुंबई पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या सर्व नोटा २ हजारच्या आहेत.

७ कोटी, ७ आरोपी! मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांचा ढीग केला जप्त
मुंबई - दहिसर परिसरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता. मात्र, मुंबई पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या सर्व नोटा २ हजारच्या आहेत.
मुंबईतील दहिसर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तब्बल ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे. या आरोपींकडून ७ मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.