Rape: १० वर्षाच्या मुलीवर ७ जणांनी केला गँगरेप; ६ आरोपी केवळ १०-१२ वयोगटातील तर तिघं नातेवाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 10:15 IST2021-06-11T10:13:17+5:302021-06-11T10:15:58+5:30
मुलीचं कुटुंब ९ जून रोजी पोलीस ठाण्यात पोहचलं आणि त्याठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Rape: १० वर्षाच्या मुलीवर ७ जणांनी केला गँगरेप; ६ आरोपी केवळ १०-१२ वयोगटातील तर तिघं नातेवाईक
रेवाडी – हरियाणाच्या रेवाडीमध्ये २४ मे रोजी काही मुलं मैदानात खेळता खेळता जवळच्या एका शाळेच्या इमारतीत गेले. त्याठिकाणी ७ मुलांनी मिळून १० वर्षाच्या मुलीवर गँगरेप केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना एक आठवड्यानंतर सगळ्यांच्या समोर आली जेव्हा पीडित मुलीच्या शेजारच्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिला. त्यांनी मुलीच्या घरच्यांना माहिती दिली त्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मुलीचं कुटुंब ९ जून रोजी पोलीस ठाण्यात पोहचलं आणि त्याठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रेवाडी डीएसपी हंसराज म्हणाले की, या गुन्ह्यात ७ जणांविरोधात आयपीसी कलम ३७६, ३५४ सी, ५०६, पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या ७ आरोपींपैकी केवळ १ वयस्क आहे. इतर आरोपींचे वय १०-१२ वयोगटातील आहे. मुलीच्या शेजाऱ्यांनी व्हिडीओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. या प्रकरणात गुन्हा नोंद होताच पोलिसांनी सातही जणांना अटक केली आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांच्या शेजारी राहतात.
३ अल्पवयीन आरोपी मुलीचे नातेवाईक
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यात मुलीवर गँगरेप झाल्याचं उघड झालं. या ७ आरोपींपैकी ४ अल्पवयीन आरोपी हे मुलीचे नातेवाईक असल्यानं पोलीस हैराण झाले. आरोपींपैकी ६ अल्पवयीन आरोपींना जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर उभं करण्यात आलं. त्यानंतर या सर्वांना सुधारगृहात पाठवलं गेले. तर १८ वर्षाच्या आरोपीला कोर्टासमोर हजर करून त्याला जेलमध्ये पाठवलं आहे. पोलीस या प्रकरणात व्हिडीओ बनवणाऱ्याचा तपास करत आहे. ज्या लोकांनी हा व्हिडीओ बनवून व्हायरल केला यांचाही पोलीस शोध घेत आहेत. कारण गुन्ह्याला साथ देणे हादेखील गुन्हा असल्याचं पोलिसांनी सांगितले.
कोरोनामुळे शाळा बंद
पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. ते एकाच गावात राहणारे होते. जेव्हा मुलं खेळत होती तेव्हा शेजारील एक शाळेची इमारत होती. कोरोना महामारीमुळं शाळा बंद आहेत. त्यामुळे या इमारतीत कोणीच नव्हतं. या मुलांनी गुन्ह्याबद्दल काहीच चर्चा केली नाही तर पीडित मुलीनेही तिच्या कुटुंबाला सांगितले नाही. नेहमीप्रमाणे आरोपी त्यांचे जीवन जगत होते. त्यांची हिंमत एवढी वाढली की त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जेव्हा ८ जून रोजी मुलीच्या शेजाऱ्यांना व्हिडीओ पाहिला तेव्हा पीडितेच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली.