दहावीच्या इंग्रजी विषयाच्या ७ उत्तरपत्रिका हरवल्या; पोलीस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 21:15 IST2019-03-19T21:13:08+5:302019-03-19T21:15:12+5:30
याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात १५ मार्चला तक्रार करण्यात आली.

दहावीच्या इंग्रजी विषयाच्या ७ उत्तरपत्रिका हरवल्या; पोलीस ठाण्यात तक्रार
नवी मुंबई - नवी मुंबईतील विवेकानंद इंग्लिश स्कूल शाळेतील एका शिक्षिकेकडून एसएससी बोर्डाच्या इंग्लिश विषयाच्या ७ उत्तरपत्रिका हरवल्या आहेत. दहावीच्या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या या उत्तरपत्रिका आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला फेरपरीक्षा झाली होती. उत्तरपत्रिका गहाळ होण्याची घटना १२ मार्चला घडली. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात १५ मार्चला तक्रार करण्यात आली.
या सर्व उत्तरपत्रिका शाळेमध्ये तपासल्यानंतर शिक्षिकेकडे उत्तरपत्रिकांचा गठ्ठा वाशी येथील एसएससी बोर्डाच्या कार्यालयात नेऊन देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. शिक्षिका तपासलेल्या उत्तरपत्रिकाचा गठ्ठा घेऊन जमा करण्यासाठी वाशी येथील बोर्डाच्या कार्यालयात येत होत्या. त्यावेळी रिक्षाने प्रवास करत असताना ७ उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असे रबाळे एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले. यापूर्वी देखील असाच प्रकार मुंबईत घडला असून कुर्ला पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.