शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या संशयावरून घर पेटवून केला प्राणघातक हल्ला, ७ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 19:47 IST

Crime News : घटनेप्रकरणी तरोडा येथील सात जणांना पोफाळी पोलीसांनी अटक केली आहे.

यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील तरोडा गावातील भोरे दाम्पत्यावर जादुटोणा करता म्हणून असा संशय घेवून सात जणांनी सामूहिकरीत्या जमवून घर पेटून दिले व त्यांना जीवे मारण्याचा पूरेपुर प्रयत्न झाला. ही घटना 20 फेब्रुवारी रविवार रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. या घटनेप्रकरणी तरोडा येथील सात जणांना पोफाळी पोलीसांनी अटक केली आहे.   

तरोडा गावात विनायक भोरे व त्यांची पत्नी उर्मिला भोरे हे दाम्पत्य घरीच असताना काही जन तोंडाला बांधून त्यांच्या घरात शिरले तुम्ही जादू टोणा करता म्हणून का जीवे मारण्यात येवू नये म्हणुन लाठया काठ्याने मारहाण केली व डिझेल/पेट्रोल टाकूण त्यांचे घर पेटून दिले. ही हृदयद्रावक घटना प्रथमच तालुक्यात तरोडा गावात घडली उर्मीला व विनायक ने मारेकऱ्यांच्या तावडीतुन कसे बसे सुटून आरडा ओरडा करूण घराबाहेर पडले. या घटनेत  दोन्हीदांम्पत्यास मारहाण झाल्याने अत्यावस्थ झाले होते अश्या अवस्थेत जखमींच्या मुलाने घटनास्थळ गाठून प्रथम उपचार करून जवळच्या मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले प्रकुती अधिक चिंताजनक असल्याने उमरखेड येथील शासकीय उतवार रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टर यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय यवतमाळ या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले विनायक भोरे यांची प्रकुती चिंताजनक असल्याने नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहीती देण्यात आली.          

उर्मीला हि बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आल्या नंतर पोफाळी पोलीसाना घटणा क्रम कथन केला फिर्यादी उर्मीला भोरे (५०) रा तरोडा त्यांच्या जबानी फिर्यादी वरुण आरोपी  समाधान बबन भुसारे वय 30 वर्ष , प्रफुल बबन भुसारे वय 21 वर्ष, आकाश भगवान धुळे वय  30 वर्ष, गोलु  भगवान धुळे वय 25 वर्ष, भगवान गंगाराम धुळे वय 50 वर्ष, भीमराव  गंगाराम धुळे वय 45 वर्ष, भास्कर लक्ष्मन हांडगे वय 29 वर्ष सर्व राहणार तरोडा गावातील असुन त्यांना भादवी कलम ४३६ , ३०७ , १४३ , १४४ , १४८, १४९, ४५२ , अन्वे अटक करण्यात आली आहे अशी माहीती पोफाळी चे ठाणेदार राजीव हाके यांनी दिली या घटनेत भोरे दांम्पत्याचे घर व मोटार सायकल जळूण खाक झाले आहे अधिक तपास पोलीस उप निरीक्षक राजेश पंडीत पोलीस कर्मचारी राम गडदे , किसन राठोड हे करीत आहे                                                  

आजच्या युगात जादुटोणासारख्या बाबी घडतात ही बाब समाजासाठी घातकच आहे. गावात किंवा परिसरात जादूटोणा होत असल्याचे किंवा करत असल्याची बाब लक्षात येताच नागरीकांनी कायदा हातात न घेता संबधित व्यक्तीसाठी समुपदेशन प्रक्रीयेचा मार्ग काढावा . नागरीकांनी अशा बाबीवर विश्वास ठेऊ नये. - दिलीप पाटील भुजबळ, पोलिस अधिक्षक 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळPoliceपोलिसfireआगHomeसुंदर गृहनियोजनArrestअटक