६४ वर्षीय वृद्धेवर बलात्कार, ३० वर्षीय दोषी आरोपीला २५ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 08:32 PM2021-10-23T20:32:48+5:302021-10-23T20:33:59+5:30

Rape Case : एल टी मार्ग पोलिसांशी संपर्क साधला आणि लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक संभोगाचा गुन्हा दाखल केला.

64-year-old raped, 30-year-old sentenced to 25 years convicted accused | ६४ वर्षीय वृद्धेवर बलात्कार, ३० वर्षीय दोषी आरोपीला २५ वर्षांची शिक्षा

६४ वर्षीय वृद्धेवर बलात्कार, ३० वर्षीय दोषी आरोपीला २५ वर्षांची शिक्षा

Next
ठळक मुद्देअखेर काल सत्र न्यायालयाने दोषी आरोपी महेशकुमारला २५ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि १५ हजार दंड ठोठावला आहे. 

६० वर्षीय वृद्ध महिलेवर चिरा बाजारात फुटपाथवर झोपलेली असताना एका नराधमाने २०१७ साली बलात्कार केला होता. याप्रकरणी एल टी मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ३७७ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी महेशकुमार उर्फ उमेश उर्फ हरिया लखनराम रावने (३०) याला बेड्या ठोकल्या होत्या. त्यापासून तो गेली ४ वर्षे आर्थर कारागृहात खडी फोडत होता. अखेर काल सत्र न्यायालयाने दोषी आरोपी महेशकुमारला २५ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि १५ हजार दंड ठोठावला आहे. 


दक्षिण मुंबईतील गजबलेल्या चिरा बाजार परिसरात २०१७ साली ऑक्टोबर महिन्यात ६० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री  २ वाजता च्या सुमारास मद्यपान केलेल्या आरोपीने वृद्ध महिलेला धमकी दिली आणि तिच्यावर  झाडामागे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.
 

मूळचा  झारखंडचा रहिवासी महेश कुमार उर्फ उमेश उर्फ हरिया लखनराम रावने हा काळबादेवीतील एका बार आणि हॉटेलमध्ये काम करायचा. त्याने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर ड्रायफ्रूट्स विकणाऱ्या वृद्ध महिलेवर हल्ला केला. त्याने प्रथम तिला धमकी दिली आणि तिला शांत राहण्यास सांगितले, नंतर तिला झाडाच्या आडोश्याला नेऊन आणि काही बंद दुकानांजवळ एका निर्जनस्थळी नेऊन जवळजवळ एक तास तिच्यावर बलात्कार केला होता.


पीडितेने मदतीची याचना केली. पण त्या वेळी कोणीही आसपास नव्हते. पळून जाण्यापूर्वी आरोपीने पीडितेला पुन्हा धमकी दिली की, या घटनेबद्दल कोणालाही सांगू नका. पीडित महिलेच्या दोन मुली गोवंडीमध्ये राहतात, त्यांच्यापैकी एकीला आईने ही घटना सांगितली. तिने एल टी मार्ग पोलिसांशी संपर्क साधला आणि लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक संभोगाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीला मरीन ड्राइव्ह येथून अटक केली. त्याने कबूल केले की, घटनेच्या वेळी तो मद्यधुंद होता. याप्रकरणी तपास अधिकारी राजाराम पाटील यांनी याप्रकरणी सबळ पुरावे गोळा केले. तसेच एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव आणि पोलीस हवालदार अनिल राऊत यांनी कोर्टातील कामकाज पाहिले. 

Web Title: 64-year-old raped, 30-year-old sentenced to 25 years convicted accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app