वाशीतून 600 किलो चांदी जप्त, जीएसटी विभागामार्फत चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 22:22 IST2020-10-22T22:21:32+5:302020-10-22T22:22:12+5:30
Silver Seized : ही चांदी अधिकृत की अनधिकृत याबाबत जीएसटी विभागामार्फत चौकशी सुरु आहे.

वाशीतून 600 किलो चांदी जप्त, जीएसटी विभागामार्फत चौकशी सुरु
नवी मुंबई : मुंबई वरून पुणेला जाणाऱ्या टेम्पो मधून पोलिसांनी सुमारे 600 किलो चांदी जप्त केली आहे. ही चांदी अधिकृत की अनधिकृत याबाबत जीएसटी विभागामार्फत चौकशी सुरु आहे.
मुंबईवरून पुणेला एका टेम्पो मधून चांदीची वाहतूक होणार असल्याची माहिती उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या विशेष पथकाचे अधिकारी जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाने वाशी पोलिसांच्या मदतीने गुरुवारी पहाटे वाशी टोलनाका येथे सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद टेम्पो अडवून त्यातील सामानाची चौकशी केली असता त्यामध्ये चांदीच्या विटा व बिस्किटे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी जीएसटी विभागाला कळवले असून त्यांच्या मार्फत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या चांदीच्या बिलांची चौकशी सुरु होती. त्यांच्या अहवालानंतर हि चांदी अधिकृत कि अनधिकृत वाहतूक केली जात होती हे स्पष्ट होणार आहे. तर यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.