शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातून परतत असलेल्या १० वर्षीय तरुणीला ६० वर्षीय म्हाताऱ्याने रस्त्यात रोखले अन् केले अश्लील चाळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 19:07 IST

Pocso Case : या प्रकरणात पोलिसांनी रूपवास रेल्वे स्टेशन भरतपूरहून अवघ्या ६ तासात अटक केली.

ठळक मुद्देपोलिसाने अनार सिंह नावाच्या ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली. भरतपूरमधील रूपवास रेल्वे स्थानकातून त्यास अटक करण्यात आली आहे.

धौलपूर - राजस्थान राज्यात कोरोना संकट असून देखील अशा लज्जास्पद घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे माणुसकीला काळिमा फासला जात आहे. धौलपूर जिल्ह्यातील कांचनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. मंगळवारी पोलिसांनी दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य आणि विनयभंगाच्या प्रकरणात पोलिसांनी ६० वर्षीय आरोपीला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी रूपवास रेल्वे स्टेशन भरतपूरहून अवघ्या ६ तासात अटक केली.

रेल्वे स्थानकातून अटककांचनपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्रकुमार शर्मा म्हणाले की, धौलपूरचे एसपी केसरसिंग शेखावत महिलांच्या गुन्ह्यांबाबत अत्यंत कठोर आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात त्वरित कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या प्रकरणात कायदा पाळत एक कारवाई केली आहे. यात पोलिसाने अनार सिंह नावाच्या ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली. भरतपूरमधील रूपवास रेल्वे स्थानकातून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विनयभंग केला. पीडित मुलीकडून लेखी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली.

मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलीपोलिस स्टेशन प्रभारी म्हणाले की, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखविली आणि तांत्रिक बाबींच्या मदतीने अवघ्या ६ तासात आरोपीला शोधले. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला शोधून अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, मुलगी जवळील दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर ६० वर्षांच्या आरोपीने मुलीला रस्त्यात रोखले. यानंतर त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले, ती मुलगी रडत घरी पोहोचली तेव्हा संपूर्ण प्रकरण कुटुंबीयांसमोर उघड झाले. यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली.

टॅग्स :Molestationविनयभंगsexual harassmentलैंगिक छळPOCSO Actपॉक्सो कायदाRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटक