अंबोलीत सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:55 IST2018-09-10T13:54:43+5:302018-09-10T13:55:55+5:30

सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न अंबोलीत रविवारी रात्री करण्यात आला. याप्रकरणी एका चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे.

6-year-old raped by neighbour in amboli, police arrested for the accused | अंबोलीत सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

अंबोलीत सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

- गौरी टेंबकर - कलगुटकर 

मुंबई : सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न अंबोलीत रविवारी रात्री करण्यात आला. याप्रकरणी एका चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे.

अंबोलीच्या रमेशनगरमध्ये पिंकी ( नावात बदल ) ही मुलगी पालकांसोबत राहते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही मुलगी घराबाहेर खेळत होती.  त्यावेळी तिच्याच शेजारी राहणाऱ्या एका मुलाने तिला 'तुझे बाबा तुला बोलवत आहेत' असे सांगितले. त्याचे बोलणे खरे वाटल्याने ती त्याच्यासोबत निघाली. त्यावेळी जवळच असलेल्या एका जंगल परिसरात तिला या मुलाने नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. त्यानंतर हा प्रकार जवळच असलेल्या इमारतीवरुन एका महिलेने पहिला आणि तिने याबाबत पोलिसांना कळविले. त्यानुसार अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या मुलाला ताब्यात घेतले आणि पिंकीला त्याच्या तावडीतून सोडविले.

'आम्ही याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे', अशी माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलासह नऊ वर्षांची दोन मुले अजून होती, असे सुत्रांचे म्हणणे आहे. मात्र गायकवाड यांनी मात्र यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: 6-year-old raped by neighbour in amboli, police arrested for the accused